Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 4:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 नवीन वरील यरूशलेम स्वतंत्र आहे; ही आपल्या सर्वांची आई आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 परंतु स्वर्गीय यरुशलेम नगरी स्वतंत्र असून ती आपली माता आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 4:26
27 Iomraidhean Croise  

परमेश्वर म्हणतो, “तुमच्या आईला मी सोडून दिल्याचे सूटपत्र कोठे आहे? ज्याला तुम्हांला विकले तो माझा सावकार कोणता? पाहा, तुमच्या दुष्कर्मामुळे तुमची विक्री झाली आहे; तुमच्या अपराधामुळे तुमच्या आईला सोडावे लागले.


यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमेस उद्धरले आहे.


परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा; पाहा, मी यरुशलेम उल्लासमय, तिचे लोक आनंदमय करतो.


यरुशलेमेबरोबर आनंद करा, तिच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिच्यामुळे उल्लासा; तिच्यासाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिच्याबरोबर अत्यंत हर्षित व्हा;


“तुम्ही आपल्या आईची चांगली कानउघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा; कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे; ती आपले शिंदळचाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो;


त्यांच्या आईने जारकर्म केले आहे, त्यांचे गर्भधारण करणारीने निर्लज्जपणाचे प्रकार केले आहेत. ती म्हणाली, ‘मला अन्न, पाणी, लोकर, ताग, तेल व पेरे पुरवणार्‍या माझ्या वल्लभांमागे मी लागेन.’


तू दिवसा ठेच खाशील, रात्री तुझ्यासह संदेष्टाही ठेच खाईल आणि मी तुझ्या आईचा नाश करीन.


“सीयोनेवर, माझ्या पवित्र डोंगरावर राहणारा परमेश्वर तुमचा देव मी आहे हे तुम्हांला कळेल, तेव्हा यरुशलेम पवित्र स्थळ होईल; ह्यापुढे परके त्यातून येणार-जाणार नाहीत.


म्हणून जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल.


तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही.


आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाची स्तुती असो.


कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.


हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वत होय, आणि ती हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे; ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे.


ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.


आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत;


पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत,


दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा.


नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले ते हे : एक स्त्री दिसली, ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा तार्‍यांचा मुकुट होता.


तिच्या कपाळावर “मोठी बाबेल, कलावंतिणींची1 व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,” हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते.


तेव्हा मी ‘पवित्र नगरी, नवी यरुशलेम’, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवर्‍यासाठी ‘शृंगारलेल्या नवरीप्रमाणे’ सजवलेली होती.


जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन; तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही; त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी, हिचे नाव,’ आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan