Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 4:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ह्या गोष्टी दृष्टान्तरूप आहेत. त्या स्त्रिया म्हणजे दोन करार होत; एक तर सीनाय पर्वतावरून केलेला; तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार, म्हणजे हागार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 या गोष्टी दृष्टांतरूपाने समजावल्या जावू शकतात. त्या स्त्रिया दोन करारासारख्या आहेत एक सीनाय पर्वतावरून केलेला व दास्यासाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 ह्या गोष्टी दृष्टान्तरूप आहेत, त्या दोन स्त्रिया म्हणजे दोन करार होत, एक स्त्री म्हणजे हागार. हिची मुले गुलामगिरीत जन्मला आली. सीनाय पर्वतावर केलेल्या कराराची ती प्रतिनिधी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 अलंकारिक रूपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 4:24
24 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “हे सारायच्या दासी हागारे, तू आलीस कोठून व जातेस कोठे?” ती म्हणाली, “माझी धनीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”


सारेची मिसरी दासी हागार हिच्यापासून अब्राहामाला इश्माएल नावाचा मुलगा झाला, त्याची वंशावळ ही :


मी म्हणालो, “अहा! प्रभू परमेश्वरा! लोक माझ्याविषयी म्हणतात, ‘हा दृष्टान्त सांगणारा नव्हे काय?”’


ते परमेश्वरामागून जातील, तो सिंहासारखा गर्जेल, तो गर्जेल आणि त्यांचे पुत्र पश्‍चिमेकडून थरथर कापत येतील.


ह्यासाठी की, संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, “मी आपले तोंड उघडून दाखले देईन; जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.”


कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे.


ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगांच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत3 त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत.


आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले. कारण ते आपल्यामागे चालणार्‍या आध्यात्मिक खडकातून पीत होते; तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वत होय, आणि ती हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे; ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे.


तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो;


ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.


तो म्हणाला, “परमेश्वर सीनायहून आला, सेईरावरून आमच्यावर1 उदय पावला; पारान पर्वतावरून तो प्रकटला, लक्षावधी पवित्रांच्या मधून तो आला, त्याच्या उजव्या हातापासून अग्निज्वाला निघाली.


तेव्हा मेलेल्यांतूनदेखील उठवण्यास देव समर्थ आहे, हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला.


नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात; त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे.


आता ज्या शांतीच्या देवाने ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’


त्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan