Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 4:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ते लोक तुम्हांला मिळवून घेण्याची खटपट करतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे; तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांला वेगळे ठेवू पाहतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 ते लोक तुमच्याविषयी आवेशी आहेत तरी चांगल्या प्रकारे नाही पण तुम्ही त्यांच्याविषयी आवेशी असावे म्हणून ते तुम्हास आमच्यापासून वेगळे करू पाहतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 ते दुसरे लोक तुम्हांला मिळवून घेण्याची खटपट करतात पण ती शुद्ध हेतूने नव्हे, तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांला माझ्यापासून वेगळे ठेवू पाहतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 ते लोक तुम्हाला आपल्या पक्षात घेण्यास उत्सुक आहेत, पण ते तुमच्या भल्यासाठी नाही. परंतु तुम्ही त्यांचे शिष्य व्हावे, म्हणून ते तुम्हाला आम्हापासून वेगळे करू पाहतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 4:17
14 Iomraidhean Croise  

अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही एक मतानुयायी मिळवण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणांहून दुप्पट असा नरकपुत्र करता.


मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.


कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.


तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि मी तुम्हांला सांगून ठेवलेले विधी जसेच्या तसे दृढ धरून पाळता, त्याबद्दल मी तुमची वाहवा करतो.


मी तुमच्याकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत.


तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात! इतक्यातच धनवान झाला आहात! आम्हांला सोडून तुम्ही तर राजे बनला आहात! तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.


तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.


मग मी तुम्हांला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?


तुम्हांला योग्य बाबतीत मिळवून घेण्याची सर्वदा खटपट करावी हे चांगले आहे, आणि हे केवळ मी तुमच्याजवळ आहे तेव्हाच करावे असे नाही.


कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात;


भ्रमात असणार्‍या लोकांतून कोणी बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करून त्यांना कामातुरपणाचे मोह घालतात.


ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan