Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 4:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मग मी तुम्हांला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मग मी तुम्हास खरे सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 मी तुम्हांला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 आता सत्य बोलून मी तुमचा शत्रू झालो काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 4:16
17 Iomraidhean Croise  

अहाब एलीयाला म्हणाला, “माझ्या वैर्‍या, तू मला गाठलेस काय?” तो म्हणाला, “होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू स्वतःला विकून टाकले आहेस.


आणि त्यांना सांगा, राजा म्हणतो, ह्या मनुष्याला बंदीत टाका, व मी सुखरूप परत येईपर्यंत त्याला शिक्षेचे अन्न व शिक्षेचे पाणी द्या.”


इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो; कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो; तो इम्लाचा पुत्र मीखाया होय.” यहोशाफाट म्हणाला, “महाराजांनी असे बोलू नये.”


तो त्याला असे बोलू लागला तेव्हा राजा त्याला म्हणाला, “मी तुला आपला मंत्री केले आहे काय? गप्प राहा; तुला मार पाहिजे काय?” तेव्हा संदेष्टा गप्प राहिला. मग तो म्हणाला, “मला ठाऊक आहे की देवाने तुझा नाश करण्याचे ठरवले आहे, कारण तू हे असे केले आहेस व माझा सल्ला घेतला नाहीस.”


नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल. तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही; कारण दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन.


निंदकाला बोल लावू नकोस, लावशील तर तो तुझा द्वेष करील; ज्ञान्याला बोल लाव म्हणजे तू त्याला अधिक प्रिय होशील.


वेशीत हितबोध करणार्‍यांचा ते द्वेष करतात, सात्त्विकपणे बोलणार्‍याचा वीट मानतात.


जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण त्याची कृत्ये वाईट आहेत अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो.


पण मी तुम्हांला खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही.


परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे मी पाहिले तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, “तू यहूदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहूद्यांसारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे?”


सुवार्तेचे सत्य तुमच्याजवळ राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही.


तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे? मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून ते मला दिले असते.


ते लोक तुम्हांला मिळवून घेण्याची खटपट करतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे; तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांला वेगळे ठेवू पाहतात.


तुम्ही चांगले धावत होता; मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हांला कोणी अडथळा केला?


Lean sinn:

Sanasan


Sanasan