Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 4:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे? मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून ते मला दिले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तर तेव्हाचा तुमचा तो आशीर्वाद कोठे आहे? कारण, मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही मला तुमचे स्वतःचे डोळे काढून दिले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 त्या वेळी तुम्हांला किती आनंद झाला होता! मग आता काय झाले? मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही आपले डोळे काढून ते मला दिले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तुमची माझ्याविषयीची आशीर्वादाची वृत्ती आता कुठे आहे? मी साक्ष देतो, की शक्य झाले असते तर तुम्ही स्वतःचे डोळेदेखील काढून मला दिले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 4:15
17 Iomraidhean Croise  

खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात; पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात.


मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.


आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.


आपण ज्या कृपेमध्ये आहोत, तिच्यात आपला प्रवेशही त्याच्या द्वारे विश्वासाने झाला आहे; आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो.


कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती.


कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो.


ह्यात उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा; म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.


आणि तुमची परीक्षा होण्याइतके माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अथवा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा, माझा स्वीकार केलात.


मग मी तुम्हांला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?


माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासंबंधी प्रसूतिवेदना होत आहेत.


आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,


तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसर्‍यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.


तुमच्यासाठी व जे लावदिकीयात व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करत आहे, त्याच्याविषयी मी साक्षी आहे.


आम्हांला तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हांला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुमच्यावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुमच्याकरता आपला जीवही देण्यास राजी होतो.


आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसांत शांतीने राहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan