Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार, ह्या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की, “तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.”1

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने, अब्राहामाला पूर्वीच शुभवर्तमान सांगितले की, ‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 ‘देव यहुदीतर लोकांना विश्वासाने नातिमान ठरविणार,’ ह्या धर्मशास्त्रलेखातील भाकितामुळे अब्राहामला पूर्वीच हे शुभवर्तमान सांगण्यात आले होते की, ‘तुझ्यामध्ये यहुदीतर आणि सर्व राष्ट्रे आशीर्वादीत होतील.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 पवित्र शास्त्राने आधी सांगितले होते की परमेश्वर विश्वासाने गैरयहूदीयांना नीतिमान ठरवतील आणि त्यांनी अब्राहामास आधी शुभवार्तेची घोषणा केली: “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 3:8
25 Iomraidhean Croise  

तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”


कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार, आणि त्याच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार.


तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीवार्र्दित होतील.”


मी आकाशातील तार्‍यांइतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीला देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील;


तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल, पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशांना तुझा विस्तार होईल; तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.


यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


त्याच्या कारकिर्दित नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो.


त्यात लोकांचा दहावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा; तरी एला व अल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुंधा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील.”2


मी याकोबातून संतान, यहूदातून माझ्या पर्वतांचा वारस उत्पन्न करीन; माझे निवडलेले त्याचे वतन पावतील, माझे सेवक तेथे वस्ती करतील.


आणि सत्याने, न्यायाने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठायी आपणांस धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील.”


शिवाय दुसर्‍याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की, “ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील.”


जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”


‘दाविदाच्या वंशाचा’ व ज्या ‘बेथलेहेमात’ दावीद होता त्या गावातून ख्रिस्त ‘येणार’ असे शास्त्रात सांगितले नाही काय?”


मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’


शास्त्रलेख फारोला असे सांगतो, “मी तुला पुढे केले आहे ते ह्याचकरता की, तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.”


तर मग आपण काय म्हणावे? असे की, जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना नीतिमत्त्व म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले.


अब्राहामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. “संतानांना” असे पुष्कळ जणांसंबंधाने तो म्हणत नाही; तर “तुझ्या संतानाला” असे एकाविषयी तो म्हणत आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे.


तरी शास्त्राने सर्वांना पापामध्ये कोंडून ठेवले आहे; ह्यात उद्देश हा की, विश्वास ठेवणार्‍यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे.


पण शास्त्रलेख काय म्हणतो? “त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणारच नाही.”


कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही; कारण त्याचा ऐकणार्‍यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही.


सातव्या देवदूताने कर्णा वाजवला; तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या : “जगाचे ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे’ झाले आहे; आणि ‘तो युगानुयुग राज्य करील.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan