Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 3:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मी असे म्हणतो की, देवाने अगोदरच [ख्रिस्ताच्या ठायी] कायम केलेला करार चारशेतीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 आणि, मी हे म्हणतो की, देवाने तो करार आधीच स्थापल्यावर चारशेतीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द करू होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 मी असे म्हणतो की, देवाने अगोदरच अब्राहामबरोबर करार केला व तो पाळण्याचे त्याने अभिवचन दिले. चारशे तीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे हा करार संपुष्टात येत नाही व अभिवचन रद्द होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मला म्हणावयाचे ते हे: चारशेतीस वर्षानंतर देण्यात आलेले नियमशास्त्र, परमेश्वराने आधी कायम केलेल्या कराराला वेगळे करू शकत नाही व दिलेले वचन रद्द करू शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 3:17
39 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू निश्‍चितपणे समज की जो देश स्वत:चा नाही, अशा देशात तुझे संतान उपरे होऊन राहील व तेथील लोकांचे दास्य करील, आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना छळतील.


त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, “मिसराच्या1 नदीपासून ते महानदी फरात येथ-पर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो.


मग देव म्हणाला, “नाही, नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल; तू त्याचे नाव इसहाक ठेव; त्याच्या पश्‍चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन.


तू माझे न्याय्यत्व खोटे पाडू पाहतोस काय? आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवतोस काय?


हा करार त्याने अब्राहामाशी केला आणि त्याविषयी इसहाकाजवळ शपथ वाहिली;


राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो.


सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला आहे तो कोणाच्याने रद्द करवेल! त्याचा हात उगारलेला आहे तर तो कोणाच्याने मागे आणवेल?


मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द होईल; अधोलोकाबरोबर केलेला तुमचा संकेत टिकणार नाही; संकटाचा लोट येईल तेव्हा तुमची पायमल्ली होईल.


“बालाका, ऊठ, ऐकून घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?


पण तिच्या पतीने ते ऐकले त्याच दिवशी तिला मनाई केली, तर तिने केलेले नवस आणि अविचाराने ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल ती रद्द ठरतील; आणि परमेश्वर तिला क्षमा करील.


कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले.


देवाने आणखी असे सांगितले की, ‘त्याची संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि ते लोक त्यांना दास करून चारशे वर्षे जाचतील.


त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे;


कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय?


माझे म्हणणे असे आहे की, तुमच्यापैकी प्रत्येक जण “मी पौलाचा,” “मी अपुल्लोसाचा,” “मी केफाचा” आणि “मी ख्रिस्ताचा” आहे, असे म्हणतो.


कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास नव्हे तर सुवार्ता सांगण्यास पाठवले; पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यास पाठवले नाही.


तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य काहीतरी आहे, अथवा मूर्ती काहीतरी आहे, असे माझे म्हणणे आहे काय? नाही;


बंधुजनहो, मी हेच म्हणतो की, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, ह्यासाठी की, ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे असावे;


देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे;2 म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारे आमेन म्हणतो.


हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.


बंधुजनहो, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो; माणसांनी देखील कायम केलेला करार कोणी रद्द करत नाही किंवा त्यात भर घालत नाही.


तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्त्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते.


मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने1 चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही.


जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही कृपेला अंतरला आहात.


ते तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारांना परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता.


म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्‍चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये;


लाघवी भाषणाने कोणी तुम्हांला भुलवू नये म्हणून हे सांगतो; कारण जरी मी देहाने दूर आहे,


हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहोत असे पत्करले.


पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे ती रद्द झाली आहे,


ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan