Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाच्या अधीन आहे कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व पाळण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 नियमशास्त्रातील कृत्यांवर अवलंबून राहणारे जितके लोक आहेत, तितके सर्व शापित आहेत, कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे, ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही, तो शापित आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जे नियमशास्त्रावर विसंबून आहेत ते सर्वजण शापाच्या बंधनाखाली आहेत. कारण पवित्रशास्त्र स्पष्ट म्हणते: “जो कोणी नियमशास्त्राच्या पुस्तकात जे सर्वकाही लिहिले आहे त्याप्रमाणे करीत नाही तो शापित आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 3:10
18 Iomraidhean Croise  

तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे;


म्हणून मी पवित्र अधिपतींना अपवित्र ठरवले, याकोबाला शापवश व इस्राएलास निंदावश केले आहे.


तू त्यांना सांग, परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, ह्या कराराची वचने जो ऐकत नाही तो शापित आहे.


त्यांनी येऊन त्याचा ताबा घेतला, परंतु त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही व तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे ते चालले नाहीत; तू त्यांना आज्ञापिले त्याप्रमाणे त्यांनी मुळीच केले नाही, म्हणून तू त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणलेस.


पाहा, सर्व जीव माझे आहेत, बापाचा जीव तसा पुत्राचा जीवही माझा आहे, जो जीवात्मा पाप करतो तो मरेल.


मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.


कारण नियमशास्त्र क्रोधाला कारणीभूत होते; परंतु जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघनही नाही.


कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.


कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही.


जिचा लेख दगडांवर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूत होत असे ती सेवा एवढी तेजस्वी होती की ‘मोशेच्या चेहर्‍याचे तेज’ नाहीसे होत चालले असूनही इस्राएल लोकांना जर त्याच्या चेहर्‍याकडे टक लावून पाहवेना,


तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे; कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी ‘मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.’


‘जो ह्या नियमशास्त्राची वचने मान्य करून ती आचरणात आणत नाही तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


परमेश्वर त्याला मुळीच क्षमा करणार नाही; पण त्याचा कोप व त्याची ईर्ष्या असल्या मनुष्यावर पेटेल, व ह्या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्याला लागतील, आणि परमेश्वर भूतलावरून त्याचे नाव खोडून टाकील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan