गलतीकरांना 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
9 आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.
9 आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून, याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्णबाला उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यांत सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे.
9 मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, पेत्र व योहान हे जे आधारस्तंभ असे मानले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आम्ही यहुदीतर लोकांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे आणि आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे.
9 जेव्हा याकोब, केफा आणि योहान असे जे श्रेष्ठ आधारस्तंभ यांना समजले की मला कृपा प्राप्त झाली आहे, तेव्हा त्यांनी माझ्याशी व बर्णबाशी सहभागितेच्या उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. त्यांनी हे मान्य केले की आम्ही गैरयहूदीयांकडे जावे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.
तो तेथून निघाल्यावर रेखाबाचा पुत्र यहोनादाब त्याच्या भेटीला येताना त्याला आढळला; त्याने त्याचे क्षेमकुशल विचारल्यावर त्याला म्हटले, “तुझ्याविषयी माझे मन जसे शुद्ध आहे तसे तुझे आहे काय?” यहोनादाब म्हणाला, “आहे.” मग तो म्हणाला, “असे असेल तर मला तुझा हात दे.” त्याने त्याला हात दिला आणि आपल्या रथात घेतले.
तेव्हा ‘उगे राहा,’ म्हणून त्याने हाताने त्यांना खुणावले, आणि आपल्याला प्रभूने कसे बाहेर काढले हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले की, “हे याकोबाला व बंधुजनांना सांगा.” नंतर तो दुसर्या ठिकाणी निघून गेला.
तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून तुमच्यामध्ये देवाने माझी निवड केली.
कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना.
तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणार्या देवाच्या कृपेने केले.
मी मूढ बनलो! असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; माझी शिफारस तुम्ही करायची होती; कारण जरी मी काही नसलो तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नव्हतो.
मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो; ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयांत घोषणा करत असतो, ती मी त्यांना निवेदन केली, परंतु जे प्रतिष्ठित होते त्यांना एकान्ती केली; नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते.
जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हांलाही ह्यासाठी कळवतो की, तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे; आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे.
जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन; तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही; त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी, हिचे नाव,’ आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन.