Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 (कारण ज्याने पेत्राला सुंता झालेल्या लोकांत प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरवली त्याने मलाही परराष्ट्रीयांत तो चालवण्यास शक्ती पुरवली),

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण ज्याने पेत्राच्याद्वारे सुंता झालेल्या लोकात प्रेषितपणा चालवावयास शक्ती पुरवली त्याने मलाही परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 कारण जसे पेत्राला यहुदी लोकांकरिता प्रेषित म्हणून नेमण्यात आले होते, तसे देवाच्या सामर्थ्याने मला यहुदीतर लोकांसाठी प्रेषित म्हणून नेमण्यात आले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 कारण जे परमेश्वर सुंता झालेल्यांसाठी प्रेषित पेत्रामध्ये करीत होते, तेच परमेश्वर गैरयहूदीयांसाठी मी जो प्रेषित आहे त्या माझ्यामध्ये सुद्धा करीत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 2:8
23 Iomraidhean Croise  

हे सेवकपद व प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाचे पद ज्याला मिळावे असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव.”


परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”


तेव्हा सर्व लोक गप्प राहिले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे व अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.


तुम्ही पाहता व ऐकता की, हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले आहे.


तेव्हा त्याने त्यांना भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्ये देवाने परराष्ट्रीयांमध्ये केली होती त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले.


तेव्हा त्याने मला सांगितले, ‘जा, मी तुला परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.”’


तथापि वचन ऐकणार्‍यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली.


तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.


परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे;


तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेने केले.


जरी मी दुसर्‍यांना प्रेषित नसलो तरी निदान तुम्हांला तरी आहे; कारण प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा तुम्ही शिक्का आहात.


जो तुम्हांला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की विश्वासपूर्वक ऐकण्याकडून?


ह्याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे.


ह्या कारणांमुळे आम्हीही देवाची निरंतर उपकारस्तुती ह्यामुळे करतो की, तुम्ही आमच्यापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते तसेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणार्‍यांत कार्य करत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan