Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तर उलट, जसे सुंता झालेल्या लोकांना सुवार्ता सांगण्याचे काम पेत्राकडे सोपवले आहे, तसे सुंता न झालेल्या लोकांना सांगण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे असे त्यांनी पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तर उलट सुंता झालेल्या यहूद्यांना शुभवर्तमान सांगणे जसे पेत्रावर सोपवले होते तसेच सुंता न झालेल्या परराष्ट्रीय लोकांस शुभवर्तमान सांगणे माझ्यावर सोपवले आहे, हे त्यांनी बघितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 उलट, ज्याप्रमाणे सुंता झालेल्या म्हणजेच यहुदी लोकांना शुभवर्तमान घोषित करण्याचे काम देवाने पेत्रावर सोपवले होते त्याचप्रमाणे सुंता न झालेल्या लोकांना म्हणजेच यहुदीतर लोकांना शुभवर्तमान सांगण्याचे काम देवाने माझ्याकडे सोपवले आहे, हे त्यांनी ओळखले

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याउलट, त्यांनी ओळखले की सुंता न झालेल्या लोकांमध्ये शुभवार्तेचा प्रचार करण्याचे कार्य मला सोपविण्यात आले आहे, ज्याप्रकारे पेत्राला सुंता झालेल्या लोकांमध्ये कार्य करण्याचे सोपविण्यात आले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 2:7
20 Iomraidhean Croise  

तेव्हा सर्व लोक गप्प राहिले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे व अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.


परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, “तुमचे रक्त तुमच्याच माथ्यावर; मी निर्दोष आहे; आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार.”


म्हणून तुम्हांला ठाऊक असो की, ‘हे देवाने सिद्ध केलेले तारण परराष्ट्रीयांकडे’ पाठवले आहे; आणि ते ते श्रवण करतील.”


परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे;


त्याच्या द्वारे आम्हांला कृपा व प्रेषितपद मिळाले; अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे.


पण आता तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो. ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो;


मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल, आणि आपण होऊन केले नाही तरी माझ्यावर कारभार सोपवला आहे.


मग तीन वर्षांनंतर मी केफाला भेटायला यरुशलेमेस वर गेलो, व त्याच्याजवळ पंधरा दिवस राहिलो.


मला आश्‍चर्य वाटते की, ज्याने तुम्हांला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात;


पुढे केफा अंत्युखियास आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले.


परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे मी पाहिले तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, “तू यहूदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहूद्यांसारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे?”


आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.


तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हांला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो; आम्ही माणसांना खूश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खूश होईल असे बोलतो.


धन्यवादित देवाच्या गौरवाची जी सुवार्ता मला सोपवलेली आहे तिला हे अनुसरून आहे.


ह्या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित (मी ख्रिस्ताठायी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही), विश्वास व सत्य ह्यांसंबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले.


मला त्या सुवार्तेचा घोषणकर्ता, प्रेषित व [परराष्ट्रीयांचा] शिक्षक असे नेमले होते.


आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हांला असेच लिहिले आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan