Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूंमुळेदेखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हांला गुलामगिरीत घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पाहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 काहींची मात्र तशी इच्छा होती. हे लोक श्रद्धावंत असल्याचे ढोंग करीत होते. ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, ते हेरून पाहण्यासाठी हे लोक गुप्तपणे आमच्या संघात सामील झाले होते. आम्ही पुन्हा गुलामगिरीत पडावे अशी त्यांची इच्छा होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 हा प्रश्न खोट्या विश्वासणार्‍यांमुळेच उद्भवला कारण ख्रिस्त येशूंमध्ये आम्हाला जे स्वातंत्र्य आहे, त्याचा शोध घेण्यासाठी आणि आम्हाला गुलाम बनविण्यासाठी काही खोटे विश्वासणारे आमच्यामध्ये घुसले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 2:4
29 Iomraidhean Croise  

मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे.


तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर;


ज्या पीडा करणार्‍यांनी तुझ्या जिवाला म्हटले, खाली वाक म्हणजे आम्ही तुझ्यावरून चालून जाऊ, आणि तुझ्यावरून ज्या चालणार्‍यांसाठी तू आपली पाठ, भूमी व रस्ता अशी केली, त्यांच्या हाती मी तो प्याला देईन.”


म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालावा, [म्हणजे दोन्हीही टिकतात.]


तेव्हा काही जणांनी यहूदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, “मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही.”


आमच्यापैकी काहींनी जाऊन आपल्या बोलण्याने (म्हणजे सुंता करून घ्यावी व नियमशास्त्र पाळावे असे सांगून) तुम्हांला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करायला सांगितले नव्हते.


तुमच्यापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.


कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे.


कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत.


जे मी बोलतो ते प्रभूला अनुसरून नव्हे, तर प्रौढीला अनुसरून मूढपणाने बोलल्याप्रमाणे बोलतो.


कारण कोणी तुम्हांला गुलामगिरीत लोटले, तुम्हांला खाऊन टाकले, तुम्हांला अंकित केले, स्वत:ला कोणी उच्च केले, कोणी तुमच्या तोंडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता.


मी कितीतरी प्रवास केला; नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, खोट्या बंधूंनी आणलेली संकटे;


प्रभू आत्मा आहे;1 आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.


ती दुसरी नाही; पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत.


हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वत होय, आणि ती हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे; ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे.


तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो;


ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.


मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही; तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी का असेना तो दंड भोगील.


त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत की जे घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या,


परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल.


दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा.


ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत; कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दासही बनतो.


प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत.


कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत; ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात; आणि एकच स्वामी देव व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan