Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो; ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयांत घोषणा करत असतो, ती मी त्यांना निवेदन केली, परंतु जे प्रतिष्ठित होते त्यांना एकान्ती केली; नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो आणि जे शुभवर्तमान मी परराष्ट्रीयात गाजवत असतो, ती मी त्यांच्यापुढे मांडले; पण जे विशेष मानलेले होते त्यांना एकांती मांडले; नाही तर, मी व्यर्थ धावतो किंवा धावलो, असे कदाचित् झाले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. ज्या शुभवर्तमानाची मी यहुदीतर लोकांत घोषणा करत असतो, त्याविषयी तेथील नेत्यांना एक खासगी सभा घेऊन निवेदन केले. माझे भूतकालीन किंवा वर्तमानकालीन सेवाकार्य व्यर्थ ठरू नये, म्हणून मी हे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मला प्राप्त झालेल्या प्रकटीकरणाचा प्रतिसाद म्हणून मी तिथे गेलो आणि तेथील प्रतिष्ठित पुढार्‍यांची एकांतात भेट घेऊन त्यांना ती शुभवार्ता सांगितली, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी गैरयहूदीयांमध्ये करीत आहे. मला खात्री करून घ्यायची होती की, मी व्यर्थ धावत नव्हतो आणि माझी धडपड मी काही व्यर्थपणे करीत आलेलो नव्हतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 2:2
26 Iomraidhean Croise  

गंध्याच्या तेलास, मरून पडलेल्या माश्यांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा ह्यांवर बसतो.


पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.


तेव्हा सर्व लोक गप्प राहिले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे व अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.


तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने यरुशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे.


नंतर ते यरुशलेमेस पोहचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडीलवर्ग ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना देवाने जे जे केले ते त्यांनी सांगितले.


तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टान्तात म्हटले, “भिऊ नकोस; बोलत जा, उगा राहू नकोस.


त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.”


परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परूशी शास्त्राध्यापक होता; त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले.


ह्यावरून हे इच्छा बाळगणार्‍यावर नव्हे किंवा धावपळ करणार्‍यावर नव्हे, तर दया करणार्‍या देवावर अवलंबून आहे.


आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा,


कारण येशू ख्रिस्त, म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्‍चय केला.


शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हांला ते मिळेल.


म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्‍चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वार्‍यावर मुष्टिप्रहार करत नाही;


प्रौढी मिरवणे मला भाग पडते; तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरणे ह्यांच्याकडे आता वळतो.


कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही, आणि ती मला कोणी शिकवलीही नाही; तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली.


मला आश्‍चर्य वाटते की, ज्याने तुम्हांला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात;


परंतु कोणीतरी प्रतिष्ठित म्हणून जे मानले जात होते, (ते कसेही असोत त्याचे मला काही नाही; माणसाला ‘देव तोंडावरून मानत नाही’) त्या प्रतिष्ठितांनी माझ्या सुवार्तेत काही भर घातली नाही,


आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.


तुम्ही चांगले धावत होता; मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हांला कोणी अडथळा केला?


असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.


ह्यावरून प्रभूच्या ठायी त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा; आणि अशांचा मान राखा;


ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठवले; कोण जाणे, भुलवणार्‍याने तुम्हांला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.


जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे;


तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan