Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे मी पाहिले तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, “तू यहूदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहूद्यांसारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 पण मी जेव्हा हे बघितले की, शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमोर मी केफाला म्हटले, “तू स्वतः यहूदी असून तू जर परराष्ट्रीयाप्रमाणे राहतोस आणि यहूद्यांप्रमाणे वागत नाहीस, तर जे परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्याच्यावर जुलूम करितोस हे कसे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे जेव्हा मी पाहिले, तेव्हा सर्वांसमक्ष मी पेत्राला म्हटले, “तू यहुदी असताही यहुदीतर लोकांसारखा वागतोस, यहुदी लोकांसारखा वागत नाहीस, तर यहुदीतर लोकांनी यहुदी लोकांसारखे वागावे म्हणून तू त्यांना भाग पाडतोस, हे कसे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जेव्हा मी पाहिले की, शुभवार्तेत जे सत्य आहे त्याप्रमाणे ते चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हणालो, “तू यहूदी आहेस तरी तू गैरयहूदीयांसारखे जगत आहेस आणि यहूदीयांसारखे नाही. तर मग हे कसे आहे की, गैरयहूदी लोकांना यहूदी प्रथा पाळण्यासाठी तू भाग पाडतोस?

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 2:14
30 Iomraidhean Croise  

नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल. तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही; कारण दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन.


जो सात्त्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो,


अहो सत्ताधीशांनो, तुम्ही यथार्थ न्याय करता काय? तुम्ही मनुष्यामनुष्यामध्ये चोख निवाडा करता काय?


कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.


सात्त्विकपणे चालणारा निर्भयपणे चालतो; कुटिल मार्गांनी चालणारा कळून येईल.


सरळांसाठी तो यश:प्राप्ती सुलभ करतो; सात्त्विकपणे चालणार्‍यांना तो ढाल आहे;


आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नकोस; आपल्या शेजार्‍याची अवश्य कानउघाडणी कर, नाहीतर त्याच्यामुळे तुला पाप लागेल.


त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊकच आहे की, यहूदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणेयेणे ठेवणे हे त्याच्या रीतीरिवाजाविरुद्ध आहे; तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखवले आहे.


तेव्हा काही जणांनी यहूदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, “मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही.”


आमच्यापैकी काहींनी जाऊन आपल्या बोलण्याने (म्हणजे सुंता करून घ्यावी व नियमशास्त्र पाळावे असे सांगून) तुम्हांला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करायला सांगितले नव्हते.


तरीपण परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले, “त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळण्याची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे.”


मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूमध्ये माझी खातरी आहे की, कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही; तथापि अमुक पदार्थ निषिद्ध आहे, असे समजणार्‍याला तो निषिद्धच आहे.


मग तीन वर्षांनंतर मी केफाला भेटायला यरुशलेमेस वर गेलो, व त्याच्याजवळ पंधरा दिवस राहिलो.


मला आश्‍चर्य वाटते की, ज्याने तुम्हांला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात;


तथापि माझ्याबरोबरचा तीत हा हेल्लेणी असताही त्यालादेखील सुंता करवून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही;


सुवार्तेचे सत्य तुमच्याजवळ राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही.


तर उलट, जसे सुंता झालेल्या लोकांना सुवार्ता सांगण्याचे काम पेत्राकडे सोपवले आहे, तसे सुंता न झालेल्या लोकांना सांगण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे असे त्यांनी पाहिले.


आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.


जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वत:चा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात.


ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्य वचनात पूर्वी ऐकले.


बाकीच्यांना भय वाटावे म्हणून पाप करणार्‍यांचा सर्वांसमक्ष निषेध कर.


आणि ‘आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा,’ ह्यासाठी की, लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा.


खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांसह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत; ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan