Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्याच्याबरोबर बाकीच्या यहूद्यांनीही ढोंग केले; ते इतके की बर्णबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा तसेच दुसर्‍या यहूदी विश्वास ठेवणाऱ्यांनीही त्याच्याबरोबर ढोंग केले; त्यामुळे बर्णबादेखील त्यांच्या ढोंगाने ओढला गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 त्याच्याबरोबर बाकीच्या यहुदी लोकांनीदेखील डरपोकपणा दाखवला. हे पाहून बर्णबाही त्यांच्याकडे ओढला गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 बाकीचे यहूदी त्याच्या ढोंगात त्याला सामील झाले, म्हणून त्यांच्या ढोंगीपणामुळे बर्णबासचीसुद्धा चुकीची कल्पना झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 2:13
17 Iomraidhean Croise  

तो त्याला म्हणाला, “तू माझा मुलगा एसावच आहेस काय?” तो म्हणाला, “होय, मीच तो.”


मी कोणाची नोकरी करणार? त्याच्या पुत्राच्या हुजुरास राहून मी सेवा करू नये काय? जशी मी तुझ्या बापाच्या हुजुरास राहून सेवा केली तशीच मी तुझ्या हुजुरास राहून करणार.”


तुझे चित्त तुला का भ्रांत करीत आहे? तू डोळे का फिरवतोस?


गंध्याच्या तेलास, मरून पडलेल्या माश्यांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा ह्यांवर बसतो.


सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा नीतिमान पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.


तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात.


कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्णबा (म्हणजे बोधपुत्र) म्हणत. त्याची शेतजमीन होती;


तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा जसे तुम्हांला वळण लावण्यात येत होते तसे तुम्ही त्या मुक्या मूर्तींकडे ओढले जात होता, हे तुम्हांला ठाऊक आहे.


फसू नका, “कुसंगतीने नीती बिघडते.”


तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?


तरी ही तुमची मोकळीक दुर्बळांना ठेच लागण्याचे कारण होऊ नये म्हणून जपा.


नंतर चौदा वर्षांनी बर्णबाबरोबर मी पुन्हा यरुशलेमेस वर गेलो. मी आपल्याबरोबर तीतालाही घेतले होते.


आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.


ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्‍या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.


विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका; कारण ज्यांकडून आचरणार्‍यांना लाभ नाही अशा खाद्यपदार्थांनी नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan