Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातील आलेल्या देवदूतानेही सांगितले, तरी तो शापित असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 परंतु जे आम्ही तुम्हांला सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान आम्ही किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितले तरी तो शापित असो!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 परंतु ज्या शुभवार्तेचा प्रचार आम्ही तुम्हाला केला, त्या व्यतिरिक्त जर आम्ही किंवा स्वर्गातून एखादा देवदूतसुद्धा प्रचार करीत असेल तर त्यांच्यावर परमेश्वराचा शाप येवो!

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 1:8
23 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल.”


तेव्हा तो त्याला म्हणाला, “मीही तुझ्यासारखाच संदेष्टा आहे; परमेश्वराच्या आज्ञेवरून एक देवदूत मला म्हणाला, ‘त्याला परत आपल्या घरी घेऊन ये, म्हणजे तो अन्नपाणी सेवन करील.”’ पण हे त्याचे सांगणे खोटे होते.


मी त्या लोकांशी वाद केला, मी त्यांना शिव्याशाप दिले, त्यांतल्या कित्येकांना मार दिला आणि त्यांचे केस उपटून देवाची शपथ घेऊन असे म्हणायला लावले की, “आम्ही इत:पर आमच्या कन्या त्यांच्या पुत्रांना देणार नाही आणि त्यांच्या कन्या आम्ही व आमचे पुत्र करणार नाही.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्हांला संदेश देणार्‍या संदेष्ट्यांची वचने ऐकू नका, ते तुम्हांला फसवतात; ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टान्त सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत.


तुम्ही ह्यापुढे, ‘परमेश्वराचे भारी वचन,’ असे म्हणू नये, कारण प्रत्येकाचे वचन त्याला स्वतःला भारी आहे; तुम्ही तर जिवंत देवाची, सेनाधीश परमेश्वर आमचा देव ह्याची वचने विपरीत केली आहेत.


मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.


परंतु तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात त्याला मी ओळखत नाही.”


ते मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही स्वतःला बद्ध करून घेतले आहे.


आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा.


कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती.


म्हणून मी तुम्हांला कळवतो की, देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस “येशू शापित आहे”3 असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून कोणालाही “येशू हा प्रभू आहे” असे म्हणता येत नाही.


जर कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करत नसेल, तर तो शापभ्रष्ट असो. माराना था.1


आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की, जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हांला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो.


कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे.”


आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; “जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे” असा शास्त्रलेख आहे;


तट पाडणार्‍या माणसाला एकदा-दोनदा बोध करून मग त्याला वर्ज्य कर;


म्हणून आता तुम्हांला असा शाप आहे की, तुमच्यातल्या कोणालाही दास होणे चुकायचे नाही; तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूडतोडे व पाणके होऊन राहाल.”


त्यांचे डोळे व्यभिचारी वृत्तीने भरलेले आहेत; आणि पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे हृदय लोभाला सवकलेले आहे; ते शापग्रस्त (लोक) आहेत;


आता माझे स्वामीराज ह्यांनी आपल्या दासाची विनंती ऐकावी; परमेश्वराने जर आपणाला माझ्याविरुद्ध चेतवले असेल तर तो हे माझे अर्पण मान्य करो; पण कोणी मानवांनी आपणाला चेतवले असेल तर परमेश्वराच्या दृष्टीने ते शापित होवोत, कारण मी परमेश्वराच्या वतनाचा वाटेकरी होऊ नये म्हणून त्यांनी मला बाहेर हाकून दिले आहे; ते म्हणतात, जा, अन्य देवतांची उपासना कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan