Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 उपोषण केलेला, वस्त्र व झगा फाडलेला, अशा स्थितीत मी संध्याकाळच्या अर्पणसमयी उठलो आणि गुडघे टेकून माझा देव परमेश्वर ह्याच्यापुढे आपले हात पसरून म्हणालो,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 संध्याकाळची अर्पणांची वेळ झाली तेव्हा मी अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेला अशा अपमानीत स्थितीत मी गुडघे टेकून व माझा देव परमेश्वर याच्यापुढे हात पसरुन बसलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 सरतेशेवटी, सायंकाळच्या होमार्पणाची वेळ झाल्यावर अत्यंत गोंधळलेल्या, माझा झगा व अंगरखा फाटलेल्या स्थितीतच मी गुडघे टेकले आणि याहवेह माझ्या परमेश्वराकडे हात उंचावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 9:5
15 Iomraidhean Croise  

शलमोनाने इस्राएलाच्या सर्व मंडळीदेखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून आकाशाकडे हात पसरले;


आणि इस्राएलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्या जिवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी ह्या मंदिराकडे आपले हात पसरून करतील,


शलमोनाने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वराला करण्याचे संपवल्यावर तो तेथून उठला.


शलमोनाने पाच हात लांब, पाच हात रुंद व तीन हात उंच असा पितळेचा एक चौरंग तयार करून अंगणाच्या मध्यभागी ठेवला होता, त्याच्यावर तो उभा राहिला आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीसमक्ष गुडघे टेकून आकाशाकडे आपले हात पसरून


हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो; मी उपास करून स्वर्गींच्या देवाची प्रार्थना केली की,


माझी प्रार्थना तुझ्यासमोर धूपाप्रमाणे माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.


मी आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे. (सेला)


याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची उपासना करू, त्याला नमन करू.


मोशे त्याला म्हणाला, “मी नगराबाहेर गेलो की परमेश्वराकडे आपले हात पसरीन तेव्हा मेघगर्जना बंद होईल व गारा पडायच्या नाहीत; ह्यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.


मोशे फारोजवळून निघून नगराबाहेर गेला आणि परमेश्वराकडे त्याने आपले हात पसरले तेव्हा मेघगर्जना व गारा बंद झाल्या व पृथ्वीवर पाऊस पडायचा थांबला.


तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.


त्या दिवसांत मी दानीएल सबंध तीन सप्तके शोक करीत होतो.


मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो दूर गेला; आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली,


मग असे झाले की, ते दिवस संपल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो; तेव्हा स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला नगराबाहेर पोहचवले. तेथे समुद्राच्या किनार्‍यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली.


ह्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या [प्रभू येशू ख्रिस्ताच्या] पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की,


Lean sinn:

Sanasan


Sanasan