Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 9:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तर आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ कृत्ये करणार्‍या ह्या लोकांशी सोयरीक करावी काय? अशाने तू आमच्यावर कोपायमान होऊन आम्हांला भस्म करशील आणि आमचा कोणी अवशेष उरू देणार नाहीस, असे नाही का तू करणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ लोकांशी सोयरीक करावी काय? काहीही शिल्लक राहणार नाही, कोणीही निसटणार नाही असा आमचा संपूर्ण नाश करीपर्यंत तुझा क्रोध आमच्यावर पेटणार नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तरी आमच्या दुष्टपणामुळे आम्ही पुन्हा तुमच्या आज्ञाचा भंग करून जे लोक अमंगळ कृत्ये करतात, त्यांच्याशी मिश्रविवाह करावे काय? खरोखर आता तुमचा संताप आम्हाला नष्ट करून आणि वाचून आलेले अवशिष्ट इस्राएली लोकही नष्ट होणार नाहीत काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 9:14
20 Iomraidhean Croise  

मग एज्रा याजक उभा राहून त्यांना म्हणाला, ”तुम्ही आज्ञेचे उल्लंघन करून अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह केल्यामुळे इस्राएलाच्या अपराधांत भर घातली,


त्यांनी आपणांस व आपल्या पुत्रांस त्यांच्या कन्या केल्या आहेत; पवित्र बीज देशोदेशीच्या लोकांत मिसळून गेले आहे; सरदार व शास्ते ह्यांचा हात ह्या पातकात प्रमुख आहे.”


सांप्रत थोडे दिवस आमचा देव परमेश्वर ह्याने आमच्यावर अनुग्रह केला आहे; आमच्यातले थोडके लोक वाचवून अवशेष ठेवले आहेत आणि आम्हांला त्याच्या पवित्रस्थानात एका खुंटीचा आधार मिळाला आहे; आमच्या देवाने आमचे डोळे सतेज केले आहेत व आमच्या दास्यात आम्हांला थोडेसे नवजीवन मिळाले आहे.


तुमच्या वाडवडिलांनीही असेच केले ना? त्यामुळे देवाने आमच्यावर व ह्या नगरावर हे सर्व अरिष्ट आणले ना? तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र न मानून इस्राएलावर आणखी अरिष्ट आणायला पाहता.”


तू त्यांच्याशी किंवा त्यांच्या देवांशी काही करार करू नकोस.


तर आता मला आड येऊ नकोस; मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो; आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो.”


सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्‍याप्रमाणे बनलो असतो.


यहूदा देशात व यरुशलेमेच्या आळ्याआळ्यांतून केलेली तुमच्या पूर्वजांची दुष्कृत्ये, यहूदाचे राजे व त्यांच्या स्त्रिया ह्यांची दुष्कृत्ये, तुमची स्वतःची व तुमच्या स्त्रियांची दुष्कृत्ये, ह्यांचा तुम्हांला विसर पडला काय?


परमेश्वर म्हणतो, माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; कारण मी तुझ्याबरोबर आहे; ज्या राष्ट्रांत मी तुला हाकून दिले आहे, त्या सर्वांचा मी सर्वस्वी नाश करीन, पण तुझा सर्वस्वी नाश करणार नाही; तरी मी तुझे योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”


तरी तुम्ही देशोदेशी परागंदा व्हाल तेव्हा राष्ट्रांमध्ये तुमच्यापैकी काही तलवारीपासून निभावून राहतील; असे अवशेष मी राखून ठेवीन.


“तुम्ही ह्या मंडळीतून वेगळे व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांना भस्म करतो.”


“तुम्ही ह्या मंडळीपासून दूर व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांचा नाश करतो.” हे ऐकून ते पालथे पडले.


त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस; आतापासून पाप करू नकोस; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”


तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय?


मला अडवू नकोस, मला त्यांचा संहार करू दे, आणि पृथ्वीवरून1 त्यांचे नाव नाहीसे करू दे, म्हणजे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ व समर्थ असे तुझेच एक राष्ट्र मी करीन.’


तसेच होरेबातही तुम्ही परमेश्वराला संतापवले, तेव्हा तो इतका रागावला की, तो तुमचा संहारच करणार होता.


तुम्ही ह्या देशाच्या रहिवाशांशी काही करारमदार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हांला म्हणालो होतो; पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले?


Lean sinn:

Sanasan


Sanasan