एज्रा 9:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तू आपले सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे दिलेल्या आज्ञा आम्ही मोडल्या आहेत; तू सांगितले होते की, ‘जो देश ताब्यात घेण्यास तुम्ही जात आहात तो देश देशोदेशींच्या लोकांच्या अशुद्धतेमुळे व अमंगळ कृतींमुळे अशुद्ध झाला आहे; त्यांनी तो देश ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्या आज्ञा, तुझे सेवक जे संदेष्टे यांच्यामार्फत तू आम्हास दिल्यास. जेव्हा तू म्हणालास, तुम्ही ज्या देशात प्रवेश करून ताब्यात घेण्यास जात आहात तो अशुद्ध देश आहे. तो त्या देशाच्या लोकांच्या अमंगळ कृत्यांनी अशुद्ध झाला आहे. त्यांनी तो देश या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुमचे सेवक संदेष्टे, त्यांनी आम्हाला आधीच इशारा देऊन ठेवला होता: ‘जो देश आम्हाला वतन म्हणून मिळेल, तो देश तिथे राहणार्या लोकांच्या भयंकर अमंगळ चाली व कृत्ये यांनी भ्रष्ट झालेला असेल. खरोखरच आज देशाच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यत तो अपवित्रतेने भरलेला आहे. Faic an caibideil |