Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 8:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 मग यरुशलेमेतील आमच्या देवाच्या मंदिराप्रत नेण्यासाठी याजक व लेवी ह्यांनी ते सोनेरुपे व ती पात्रे तोलून घेतली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 यावर, एज्राने वजन करून दिलेल्या खास भेटवस्तू आणि सोने व चांदी याजकांनी व लेवींनी ताब्यात घेतल्या. यरूशलेमेमधील देवाच्या घरात त्यांना घेऊन जाण्यास सांगण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 तेव्हा याजक आणि लेवींनी तोलून दिलेले चांदी, सोने व पवित्र पात्रे यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरात पोचविण्याची जबाबदारी स्वीकारली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 8:30
6 Iomraidhean Croise  

त्यांची यादी येणेप्रमाणे : सोन्याच्या तीस पराती, चांदीच्या एक हजार पराती, एकोणतीस सुर्‍या,


वाटेने शत्रूंपासून आमचा बचाव होण्यासाठी राजाकडे शिपाई व घोडेस्वार ह्यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली; कारण आम्ही राजाला असे बोलून चुकलो होतो की, “आमच्या देवाला शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरदहस्त असतो, पण जे त्याचा त्याग करतात त्यांच्यावर त्याचे बल व त्याचा क्रोध ही प्रकट होतात.”


चौथ्या दिवशी ते सोनेरुपे व ती पात्रे आमच्या देवाच्या मंदिरात तोलून मरेमोथ बिन उरीया याजकाच्या हवाली केली; त्याच्याबरोबर एलाजार बिन फिनहास, योजाबाद बिन येशूवा आणि नोवद्या बिन बिन्नुई हे लेवी होते.


परमेश्वर आमचा देव ह्याच्या घरासाठी तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन.


माझे पवित्रस्थान शोभिवंत व्हावे म्हणून लबानोनाचे वैभव तुझ्याकडे येईल; अर्थात सुरू, देवदारू, भद्रदारू हे सर्व मिळून तुझ्याकडे येतील; माझे पादासन मी शोभायमान करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan