Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 8:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आमच्या देवाचा आमच्यावर वरदहस्त असल्यामुळे त्यांनी आमच्याकडे महली बिन लेवी बिन इस्राएल ह्याच्या वंशातला एक समंजस मनुष्य आणला; आणि शेरेब्या व त्याचे पुत्र व बांधव असे अठरा जण आणले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 देवाचा आमच्यावर चांगला हाथ असल्यामुळे इद्दोच्या नातलगांनी आमच्याकडे इस्राएलाचा मुलगा लेवी याचा मुलगा महली याच्या वंशातला एक शहाणा मनुष्य आणला, आणि शेरेब्याचे पुत्र आणि त्याचे भाऊ असे एकंदर अठराजण आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परमेश्वराच्या कृपेचा हात आमच्यावर असल्याने त्यांनी आम्हाकडे इस्राएलचा पुत्र लेवीचा वंशज, महलीचा पुत्र शेरेब्याह नावाचा एक सुज्ञ मनुष्य पाठविला. त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व भाऊ मिळून एकूण 18 जण होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 8:18
22 Iomraidhean Croise  

लेवीचे पुत्र : गेर्षोन, कहाथ व मरारी.


मरारीचे पुत्र : महली व मूशी. त्यांच्या-त्यांच्या पितृकुळांप्रमाणे लेव्यांची कुळे हीच होत.


एलाजारास फिनहास झाला, फिनहासास अबीशूवा झाला,


जे लेवी परमेश्वराच्या सेवेत प्रवीण होते त्या सर्वांना हिज्कीयाने आश्वासन दिले. ह्या प्रकारे शांत्यर्पणे करीत व आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद करीत त्या पर्वाचे सात दिवस ते उत्सव करीत राहिले.


राजा, त्याचे मंत्री व राजाचे सर्व पराक्रमी सरदार ह्यांची माझ्यावर दया व्हावी असे देवाने केले आहे. माझा देव परमेश्वर ह्याचा माझ्यावर वरदहस्त होता. त्यामुळे हिंमत धरून माझ्याबरोबर जाण्यासाठी इस्राएलातील प्रमुख पुरुष मी एकत्र केले.


हाच एज्रा बाबेलहून गेला; हा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता; त्याचा देव परमेश्वर ह्याचा वरदहस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सर्व मनोरथ पूर्ण केला.


पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस तो बाबेलहून निघाला; देवाचा वरदहस्त त्याच्यावर असल्यामुळे तो पाचव्या महिन्याच्या प्रतिपदेस यरुशलेमेस पोचला.


मग मी निरोप पाठवून अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखर्‍या व मशुल्लाम ह्या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान ह्या सुज्ञ पुरुषांना बोलावून आणले.


हशब्या व त्याच्याबरोबर मरारी वंशातील यशाया आणि त्याचे बांधव व पुत्र मिळून वीस जण आणले.


वाटेने शत्रूंपासून आमचा बचाव होण्यासाठी राजाकडे शिपाई व घोडेस्वार ह्यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली; कारण आम्ही राजाला असे बोलून चुकलो होतो की, “आमच्या देवाला शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरदहस्त असतो, पण जे त्याचा त्याग करतात त्यांच्यावर त्याचे बल व त्याचा क्रोध ही प्रकट होतात.”


मग मी याजकांपैकी शेरेब्या, हशब्या व त्यांचे दहा बांधव अशा बारा प्रमुख पुरुषांना निराळे केले.


जक्कूर, शेरेब्या, शबन्या,


आणि लेव्यांतले मुख्य हशब्या, शेरेब्या व कदमीएलाचा पुत्र येशूवा व त्यांच्यासमोर त्यांचे भाऊबंद असे गटागटाने देवाचा मनुष्य दावीद ह्याच्या आज्ञेप्रमाणे स्तवन व ईशोपकारस्मरण करायला होते.


आणि महाराजांच्या जंगलाचा अधिपती आसाफ ह्याला असे पत्र द्यावे की मंदिराच्या गढीच्या दरवाजांसाठी तुळया काढण्यासाठी, शहराच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावीत.” माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली.


येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजर्‍या, योजाबाद, हानान व पलाया, हे लेव्यांसह नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते; व लोक आपल्या जागेवर उभे होते.


सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते;


तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.


मी तुम्हांला माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन; ते तुम्हांला ज्ञान व अक्कल ह्यांनी तृप्त करतील.


ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतींत राजा त्यांना जे काही विचारी त्यांत ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिष्यांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे त्याला दिसून येई.


मरारीचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : माहली व मूशी. लेव्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे हीच आहेत.


बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan