Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 8:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मी त्यांना कासिफ्या नावाच्या स्थानाचा नायक इद्दो ह्याच्याकडे पाठवले आणि आमच्याकडे आमच्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ सेवाचाकरी करणारे घेऊन यावेत म्हणून कासिफ्या येथे इद्दो व त्याचे बांधव नथीनीम ह्यांना काय सांगावे हे मी त्यांना कळवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कासिफ्याचा मुख्य इद्दो याच्याकडे मी त्यांना पाठवले. त्यास आणि त्याच्या नातलगांना काय सांगायचे हे मी त्यांना सांगितले. जे मंदिरात सेवाचाकरी करणारे कासिफ्यात राहत होते त्यांनी देवाच्या घरात सेवाचाकरी करण्यासाठी आमच्याकडे माणसे पाठवावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मी त्यांना कासिफ्या नावाच्या ठिकाणी असलेल्या यहूद्यांचा पुढारी इद्दो आणि मंदिरात काम करणारे त्याचे लेवीबंधू याजकडे अशी विनंती करण्यासाठी पाठविले की त्यांनी यरुशलेमातील आमच्या परमेश्वराच्या मंदिरातील सेवेसाठी सेवेकरी पाठवावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 8:17
16 Iomraidhean Croise  

राजाने विचारले, “ह्या प्रकरणात यवाबाचा हात आहे की नाही?” त्या स्त्रीने उत्तर केले, “माझे स्वामीराज, आपल्या जीविताची शपथ, जे काही माझे स्वामीराजे बोलले आहेत त्यापासून कोणाला उजवीडावीकडे जाता येत नाही; आपला सेवक यवाब ह्यानेच मला आज्ञा केली व ह्या सर्व गोष्टी त्यानेच आपल्या दासीच्या तोंडी घातल्या.


मग राजाकडे जाऊन असे असे बोल.” यवाबाने तिला काय बोलायचे ते शिकवले.


जे प्रथम आपल्या वतनाच्या नगरात राहण्यास आले ते इस्राएल, याजक, लेवी व नथीनीम हे होते.


नथीनीमांपैकी : सीहाचे वंशज, हसूफाचे वंशज, तब्बावोथाचे वंशज,


सर्व नथीनीम व शलमोनाच्या चाकरांचे वंशज हे सगळे मिळून तीनशे ब्याण्णव होते.


इस्राएल लोक, याजक, लेवी, गायक, द्वारपाळ व नथीनीम ह्यांतले काही जण मिळून अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी यरुशलेमेस गेले.


मग मी निरोप पाठवून अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखर्‍या व मशुल्लाम ह्या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान ह्या सुज्ञ पुरुषांना बोलावून आणले.


तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल; मी त्याच्या व तुझ्या मुखाला साहाय्य होईन, आणि तुम्ही काय करायचे ते तुम्हांला शिकवीन.


तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला, व तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत;


ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो “तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन; तू हीणकसापासून मौल्यवान वेगळे करशील तर तू माझे मुख होशील. ते तुझ्याकडे परत येतील, पण तू त्यांच्याकडे जाणार नाहीस.


मी स्वत: तुमच्या लेवी बांधवांना इस्राएल लोकांमधून घेतले आहे; दर्शनमंडपाची सेवा करण्यासाठी परमेश्वराला ते वाहिलेले असून मी तुम्हांला दान म्हणून ते दिले आहेत;


मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंदांतून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन; त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील.


मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो की, तू अपुर्‍या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावीस, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील1 नेमावेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan