Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 8:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मग मी निरोप पाठवून अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखर्‍या व मशुल्लाम ह्या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान ह्या सुज्ञ पुरुषांना बोलावून आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तेव्हा, अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखऱ्या, आणि मशुल्लाम या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान या शिक्षकांना मी निरोप पाठवून बोलवून आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 म्हणून मी निरोप पाठवून एलिएजर, अरीएल, शमायाह, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखर्‍याह आणि मशुल्लाम या लेवी पुढार्‍यांना बोलाविले. मी योयारीब व एलनाथान या दोघा शिक्षकांनाही बोलाविणे पाठविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 8:16
16 Iomraidhean Croise  

देव त्याला म्हणाला, “तू असला वर मागितलास; दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश ह्यांपैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेकबुद्धी मागितलीस,


कालप्रवृत्ती ओळखून इस्राएलाने काय करावे हे ज्यांना कळत होते असे इस्साखार वंशातील दोनशे नायक आले; त्यांचे सर्व भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते.


पूर्वद्वाराची चिठ्ठी शलेम्याचा नावाची निघाली. त्यांनी त्याचा पुत्र जखर्‍या जो सुज्ञ मंत्री होता त्याच्या नावाची चिठ्ठी टाकली ती उत्तरद्वाराची निघाली.


हूरामाने आणखी असे लिहिले की, “आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता, इस्राएलाचा देव परमेश्वर धन्य; परमेश्वराप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याच्या आणि राजमंदिर बांधण्याच्या कार्यासाठी त्याने दावीद राजाला बुद्धिसंपन्न आणि चातुर्य व अक्कल ह्यांनी मंडित असा पुत्र दिला आहे.


आणि हारीमाच्या वंशातले मासेया, एलीया, शमाया, यहीएल व उज्जीया;


शलेम्या, नाथान, अदाया,


अदोनीकामाच्या वंशातले जे शेवटचे त्यांची नावे ही : अलीफलेट, यइएल व शमाया आणि त्यांच्याबरोबर साठ पुरुष.


अहवा नदीला जी नदी मिळते तिच्याजवळ मी त्यांना जमवले; तेथे आम्ही डेरे देऊन तीन दिवस राहिलो; आणि मी लोकांची व याजकांची पाहणी केली तेव्हा मला लेवीच्या वंशातले कोणी दिसले नाहीत.


मी त्यांना कासिफ्या नावाच्या स्थानाचा नायक इद्दो ह्याच्याकडे पाठवले आणि आमच्याकडे आमच्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ सेवाचाकरी करणारे घेऊन यावेत म्हणून कासिफ्या येथे इद्दो व त्याचे बांधव नथीनीम ह्यांना काय सांगावे हे मी त्यांना कळवले.


आमच्या देवाचा आमच्यावर वरदहस्त असल्यामुळे त्यांनी आमच्याकडे महली बिन लेवी बिन इस्राएल ह्याच्या वंशातला एक समंजस मनुष्य आणला; आणि शेरेब्या व त्याचे पुत्र व बांधव असे अठरा जण आणले;


कारण ज्ञान परमेश्वर देतो; त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात;


मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढतो.


देशाच्या पातकामुळे त्याचे बहुत अधिपती होतात, पण समंजस व जाणत्या माणसांच्या हातून त्याची सुस्थिती दीर्घकाळ राहते.


तोच प्रसंग व समय बदलतो; तो राजांना स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करितो; तो ज्ञान्यांस ज्ञान देतो व बुद्धिमानांस बुद्धी देतो.


जे मी बोलतो ते समजून घे; कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजावून देईल.


आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan