Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 8:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 अहवा नदीला जी नदी मिळते तिच्याजवळ मी त्यांना जमवले; तेथे आम्ही डेरे देऊन तीन दिवस राहिलो; आणि मी लोकांची व याजकांची पाहणी केली तेव्हा मला लेवीच्या वंशातले कोणी दिसले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मी त्यांना अहवाकडे वाहणाऱ्या कालव्याजवळ जमवले. त्याठिकाणी आमचा तीन दिवस मुक्काम होता. तेथे मी लोकांची व याजकांची तपासणी केली पण तेथे लेवीचे कोणीही वंशज सापडले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 अहवाकडे जाणाऱ्या कालव्याजवळ मी सर्वांना एकत्र केले आणि तिथे तीन दिवस आम्ही तळ दिला. तिथे आलेल्या लोकांची व याजकांची पाहणी केली, तेव्हा लेवी वंशातील कोणीही मला आढळला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 8:15
12 Iomraidhean Croise  

तसेच आम्ही असे फर्मावतो की, देवाच्या ह्या मंदिरातील जे कोणी याजक, लेवी, गायक, द्वारपाळ, नथीनीम व इतर सेवक असतील त्यांच्यापासून खंडणी, कर अथवा जकात घ्यायची नाही.


राजा, त्याचे मंत्री व राजाचे सर्व पराक्रमी सरदार ह्यांची माझ्यावर दया व्हावी असे देवाने केले आहे. माझा देव परमेश्वर ह्याचा माझ्यावर वरदहस्त होता. त्यामुळे हिंमत धरून माझ्याबरोबर जाण्यासाठी इस्राएलातील प्रमुख पुरुष मी एकत्र केले.


इस्राएल लोक, याजक, लेवी, गायक, द्वारपाळ व नथीनीम ह्यांतले काही जण मिळून अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी यरुशलेमेस गेले.


बिग्वईच्या वंशांतले ऊथय व जब्बूद व त्यांच्याबरोबर सत्तर पुरुष.


मग मी निरोप पाठवून अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखर्‍या व मशुल्लाम ह्या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान ह्या सुज्ञ पुरुषांना बोलावून आणले.


फिनहासाच्या वंशातला गेर्षोम, इथामाराच्या वंशातला दानीएल व दाविदाच्या वंशातला हट्टूश.


मग मी अहवा नदीतीरी उपास करण्याचे जाहीर केले; त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे.


पहिल्या महिन्याच्या द्वादशीस अहवा नदीपासून कूच करून आम्ही यरुशलेमेचा मार्ग धरला. आमच्या देवाचा वरदहस्त आमच्यावर असल्यामुळे त्याने शत्रूंपासून व वाटेत घात करण्यास टपून बसणार्‍यांपासून आमचे रक्षण केले.


बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो; हो, तेथे आम्हांला सीयोनेची आठवण झाली; तेव्हा आम्ही रडलो.


मी खबार नदीच्या तीरी पकडून आणलेल्या लोकांत राहत होतो, तेव्हा तिसाव्या वर्षाच्या चौथ्या मासी पंचमीस असे झाले की आकाश दुभागून मला दिव्य दृष्टान्त दिसले.


त्यानंतर धरून नेलेले लोक राहत असत तेथे त्यांच्याकडे खबार नदीच्या तीरी तेल-अबीब ह्या ठिकाणी मी आलो आणि ते बसले होते तेथे मी बसलो; भयचकित होऊन सात दिवस त्यांच्यामध्ये मी बसून राहिलो.


मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हांला वाटले तेथे जाऊन बसलो; आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan