Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 8:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीत माझ्याबरोबर बाबेलहून आले त्यांच्या पितृकुळांचे प्रमुख व त्यांची वंशावळी येणेप्रमाणे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आणि बाबेलहून माझ्याबरोबर अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीत पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख त्यांची नावे ही आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीत, बाबेलहून माझ्याबरोबर आलेल्या पुढार्‍यांची नावे व वंशावळी येणेप्रमाणे आहे:

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 8:1
16 Iomraidhean Croise  

ह्यांनीही आपले बांधव अहरोनवंशज ह्यांच्याप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमलेख आणि याजकांच्या व लेव्यांच्या पितृकुळाचे प्रमुख पुरुष ह्यांच्यासमोर चिठ्ठ्या टाकल्या; मुख्य पुरुषाचे पितृकुळ त्याच्या कनिष्ठ बांधवांच्या पितृकुळाबरोबर गणले.


त्यांचे बांधव वीर असून आपापल्या पितृकुळांचे मुख्य होते; ते दोन हजार सातशे होते. त्यांना दावीद राजाने देवाच्या कार्यासंबंधाने व राजाच्या सर्व कारभारासंबंधाने रऊबेनी, गादी, व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांच्यावर देखरेख करण्याच्या कामावर नेमले होते.


आणि बालापर्यंतची त्याच नगरांच्या आसपासची खेडीपाडी; त्यांची वसतिस्थाने व वंशावळ्या ह्या होत.


ह्या प्रकारे सर्व इस्राएल लोकांची त्यांच्या-त्यांच्या वंशांप्रमाणे गणती झाली; त्यांच्या वंशावळ्या इस्राएलाच्या राजांच्या बखरीत नमूद केल्या आहेत; यहूदी लोकांनी पाप केल्यामुळे त्यांना पाडाव करून बाबेल देशात नेले.


हे त्यांच्या-त्यांच्या पिढ्यांतले, लेव्यांच्या पितृ-कुळातले प्रमुख पुरुष होत; ते यरुशलेमेत राहत.


पितृकुळातील प्रमुख पुरुष जे शूर वीर असत त्यांची एकंदर संख्या दोन हजार सहाशे होती.


तेव्हा यरुशलेमेतील परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी वरती जाण्यास देवाने ज्यांच्या मनास स्फूर्ती दिली ते यहूदा व बन्यामीन ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख, याजक व लेवी उठून सिद्ध झाले.


जरूब्बाबेलबरोबर आले ते येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम, बाना. इस्राएल लोकांतल्या मनुष्यांची ही मोजदाद आहे :


पारोशाचे वंशज दोन हजार एकशे बाहत्तर,


ह्या सर्वांनी आपापल्या वंशावळींचा लेख ज्यांची वंशावळी नोंदली होती त्यांच्या वहीत शोधला पण त्यांना तो न मिळाल्यामुळे ते अशुद्ध ठरून याजकपदावरून भ्रष्ट झाले.


मी असे फर्मावतो की माझ्या राज्यातील जे इस्राएल लोक व त्यांचे जे याजक व लेवी आपखुशीने यरुशलेमेत जाऊ इच्छित असतील त्यांना तुझ्याबरोबर जाण्याची परवानगी आहे;


राजा, त्याचे मंत्री व राजाचे सर्व पराक्रमी सरदार ह्यांची माझ्यावर दया व्हावी असे देवाने केले आहे. माझा देव परमेश्वर ह्याचा माझ्यावर वरदहस्त होता. त्यामुळे हिंमत धरून माझ्याबरोबर जाण्यासाठी इस्राएलातील प्रमुख पुरुष मी एकत्र केले.


हाच एज्रा बाबेलहून गेला; हा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता; त्याचा देव परमेश्वर ह्याचा वरदहस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सर्व मनोरथ पूर्ण केला.


इस्राएल लोक, याजक, लेवी, गायक, द्वारपाळ व नथीनीम ह्यांतले काही जण मिळून अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी यरुशलेमेस गेले.


फिनहासाच्या वंशातला गेर्षोम, इथामाराच्या वंशातला दानीएल व दाविदाच्या वंशातला हट्टूश.


Lean sinn:

Sanasan


Sanasan