Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 7:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मी अर्तहशश्त राजा महानदाच्या पश्‍चिमेकडील सर्व भांडार्‍यांस अशी आज्ञा करीत आहे की, एज्रा याजक जो स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत आहे तो जे काही तुमच्याकडे मागेल ते सर्व ताबडतोब त्याला द्यावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आता, मी, राजा अर्तहशश्त, असा आदेश काढतो की नदीपलीकडच्या सर्व खजिनदारांनी जे काही एज्रा तुम्हाजवळ मागेल ते पूर्ण द्यावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 आता, मी राजा अर्तहशश्त, हा हुकूमनामा फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांतातील सर्व खजिनदारांकडे पाठवित आहे. स्वर्गातील परमेश्वराचे नियम शिकविणारा शिक्षक व याजक एज्रा जी विनंती करेल व जे तुमच्याकडे मागेल ते त्याला द्यावे—

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 7:21
11 Iomraidhean Croise  

आम्ही महाराजांना हे निक्षून सांगतो की, हे नगर बांधण्यात आले व ह्याचे कोट बांधून तयार झाले तर महानदाच्या पश्‍चिमेकडे आपला काहीच मुलुख राहायचा नाही.”


ह्या यरुशलेमेत पराक्रमी राजे होऊन गेले; त्यांनी महानदाच्या पश्‍चिमेकडल्या सगळ्या देशांवर राज्य केले; लोक त्यांना खंडणी, कर व जकात देत असत.


‘तर आता महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे स्नेही अफर्सखी असे तुम्ही तेथून दूर व्हा;


ह्यानंतर पारसाचा राजा अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीत एज्रा बिन सराया बिन अजर्‍या बिन हिल्कीया


रुपे शंभर किक्कारपर्यंत,1 गहू शंभर कोरपर्यंत,2 द्राक्षारस शंभर बथपर्यंत,2 तेल शंभर बथपर्यंत व लागेल तेवढे मीठ देण्यात यावे.


हाच एज्रा बाबेलहून गेला; हा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता; त्याचा देव परमेश्वर ह्याचा वरदहस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सर्व मनोरथ पूर्ण केला.


मग त्यांनी राजाचे फर्मान महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांतांवरील राजाचे मुतालिक व प्रांताधिपती ह्यांना दिले; त्यांनी इस्राएल लोकांना देवाच्या मंदिराच्या कामी साहाय्य केले.


मग मी राजाला म्हणालो, “महाराजांच्या मर्जीस आल्यास मी यहूदा देशात पोहचेपर्यंत महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिपतींच्या नावांवर मला पत्रे द्यावीत;


तुझे विधी आम्ही मनःपूर्वक पाळावेत म्हणून तू ते आम्हांला लावून दिले आहेत.


मी फर्मावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे; कारण तो जिवंत देव आहे; तो सर्वकाळ जवळ आहे; त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan