Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 7:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तू त्या पैशांचे बैल, मेंढे, कोकरे, व त्यांबरोबरची अन्नार्पणे व पेयार्पणे ही हयगय न करता खरेदी करून यरुशलेमेतील तुमच्या देवाच्या मंदिरात असलेल्या वेदीवर अर्पण करावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 या पैशातून तू बैल, मेंढे, कोकरे घे. तसेच त्या सोबतची अन्नार्पणे आणि पेयार्पणेही विकत घे. मग ती यरूशलेमेमधील तुमच्या देवाच्या मंदिरातील वेदीवर अर्पण कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 या पैशाचा उपयोग बैल, मेंढे, कोकरे, अन्न व पेय विकत घेण्यासाठी करून यरुशलेम येथील तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात त्यांच्या वेदीवर या सर्वांचे अर्पण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 7:17
10 Iomraidhean Croise  

यरुशलेमेतील देवाच्या ह्या मंदिराचा विध्वंस करावा ह्या उद्देशाने ह्या आज्ञेत जे कोणी खटपटी करतील व जे कोणी राजे किंवा लोक ती फिरवावी म्हणून तीत हात घालतील त्या सर्वांचा निःपात ज्या देवाने तेथे आपल्या नामाचा निवास केला आहे तो करील; मी दारयावेश हा हुकूम करीत आहे त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी.”


जे सोने व रुपे शिल्लक राहील त्याचा विनियोग तुला व तुझ्या भाऊबंदांना योग्य वाटेल तसा आपल्या देवाच्या इच्छेप्रमाणे करावा.


अधिपतीस पाठवायचा कोकरांचा नजराणा तुम्ही रानाजवळचे सेला येथून सीयोनकन्येच्या पर्वताकडे रवाना करा.


आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे ह्यांचे परमेश्वराप्रीत्यर्थ हवन कराल, मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमलेल्या सणातला तो यज्ञ असो,


आणि मंदिरात गुरे, मेंढरे, कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan