Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 7:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तुझ्याजवळ देवाचे जे नियमशास्त्र आहे त्यानुसार यहूदा व यरुशलेम ह्यांची स्थिती आहे किंवा कसे ह्याचा तपास करावा म्हणून राजा व त्याचे सात मंत्री ह्यांच्याकडून तुला रवाना करण्यात येत आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तुजजवळ जे देवाचे नियमशास्त्र आहे त्याप्रमाणे यहूदा आणि यरूशलेम याविषयी तपास करावा म्हणून राजा व त्याचे सात सल्लागार तुला पाठवत आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 राजा आणि त्याचे सातजणांचे सल्लागार मंडळ तुला सूचना देत आहोत की, तुझ्याजवळ असलेल्या परमेश्वराच्या नियमानुसार यहूदीया व यरुशलेमबद्दल समाचार घेण्यासाठी तुला पाठविण्यात येते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 7:14
15 Iomraidhean Croise  

त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल - त्याच्याबरोबर त्याचा देव असो - त्याने यहूदातील यरुशलेमेस जाऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधावे; यरुशलेमेत जो आहे तोच देव होय.


महाराजांना कळावे की आम्ही यहूदा प्रांतातील थोर देवाच्या मंदिराकडे गेलो होतो; तेथे पाहतो तर ते मोठ्या पाषाणाचे बांधत आहेत व भिंतीवर लाकडेही पडली आहेत; हे काम मोठ्या झपाट्याने चालले असून त्यांच्या हातांनी सिद्धीस जात आहे;


यरुशलेमेतील देवाच्या ह्या मंदिराचा विध्वंस करावा ह्या उद्देशाने ह्या आज्ञेत जे कोणी खटपटी करतील व जे कोणी राजे किंवा लोक ती फिरवावी म्हणून तीत हात घालतील त्या सर्वांचा निःपात ज्या देवाने तेथे आपल्या नामाचा निवास केला आहे तो करील; मी दारयावेश हा हुकूम करीत आहे त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी.”


ह्याखेरीज हे देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहूद्यांच्या वडील जनांशी तुमचे काय कर्तव्य आहे ह्याविषयी मी तुम्हांला अशी आज्ञा करतो की राजधनातून म्हणजे अर्थात महानदाच्या पश्‍चिम प्रांतांच्या करामधून ह्या लोकांना खर्च ताबडतोब पुरवावा; त्यांना काही अडथळा करू नये.


आणि यरुशलेमनिवासी जो इस्राएलाचा देव त्याला राजाने व त्याच्या मंत्र्यांनी स्वसंतोषाने अर्पण केलेले सोने व रुपे तू न्यावेस;


राजा, त्याचे मंत्री व राजाचे सर्व पराक्रमी सरदार ह्यांची माझ्यावर दया व्हावी असे देवाने केले आहे. माझा देव परमेश्वर ह्याचा माझ्यावर वरदहस्त होता. त्यामुळे हिंमत धरून माझ्याबरोबर जाण्यासाठी इस्राएलातील प्रमुख पुरुष मी एकत्र केले.


जे सोनेरुपे व जी पात्रे राजा, त्याचे मंत्री, त्याचे सरदार व तेथे असलेले सर्व इस्राएल ह्यांनी आमच्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ अर्पण केली होती ती तोलून मी त्यांच्या स्वाधीन केली;


त्याच्याजवळ कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना व ममुखान हे पारस व मेदय येथले सात सरदार असत. ते राजाच्या हुजुरास असून राज्यात त्यांचा पहिला मान असे;)


नियमशास्त्र व साक्ष ह्यांकडे पाहा! ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्‍चये प्रभातसमय नाही.


राजाने दानिएलास म्हटले, “तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्ये प्रकट करणारा देव आहे.”


तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, “हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय?”


मी फर्मावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे; कारण तो जिवंत देव आहे; तो सर्वकाळ जवळ आहे; त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे.


“बंदिवासातून आलेल्या लोकांपैकी हेल्दय, तोबीया व यदया ह्यांच्या माणसांना बरोबर घे; ते बाबेलहून येऊन सफन्याचा पुत्र योशीया ह्याच्या घरी उतरले आहेत, तेथे आजच्या आज जा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan