Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 7:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 “स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री एज्रा याजक ह्याला राजाधिराज अर्तहशश्त इत्यादी;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 “स्वर्गातील देवाचा नियमशास्त्राचा शिक्षक व याजक एज्रा यास, राजांचा राजा अर्तहशश्त याजकडून,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 राजांचा राजा, जो अर्तहशश्त याजकडून, स्वर्गातील परमेश्वराचे नियम शिकविणारा शिक्षक एज्रा याजक यास: शुभेच्छा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 7:12
15 Iomraidhean Croise  

अरामाचा राजा बेन-हदाद ह्याने आपली सारी सेना एकवट केली; त्याच्याबरोबर बत्तीस राजे, घोडे व रथ होते; त्यांसह तो गेला; आणि शोमरोनास वेढा घालून त्याच्याशी लढला.


महानदाच्या अलीकडच्या सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या देशांवर जितके राजे होते त्या सर्वांवर शलमोनाचे प्रभुत्व होते; आणि आसपासच्या सर्व देशांच्या लोकांशी त्याचे सख्य असे.


“पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गींचा देव परमेश्वर ह्याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहूदा प्रांतातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध;


मग राजाने उत्तर पाठवले की, “रहूम राजमंत्री, शिमशय लेखक आणि शोमरोनात आणि महानदाच्या पश्‍चिमेकडे राहणारे त्यांचे इतर स्नेही ह्यांना सलाम, इत्यादी -


ह्यानंतर पारसाचा राजा अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीत एज्रा बिन सराया बिन अजर्‍या बिन हिल्कीया


एज्रा याजक शास्त्री असून परमेश्वराची आज्ञावचने व त्याने इस्राएलास विहित केलेले नियम ह्यांत पारंगत होता; त्याला अर्तहशश्त राजाने जे पत्र दिले त्याची नक्कल ही :


हाच एज्रा बाबेलहून गेला; हा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता; त्याचा देव परमेश्वर ह्याचा वरदहस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सर्व मनोरथ पूर्ण केला.


तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?


कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी बाबेलचा राजा, राजाधिराज नबुखद्रेस्सर, ह्याला उत्तरेहून घोडे, रथ, स्वार व मोठे दळ ह्यांसह सोरेवर आणीन.


महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल व वैभव ही दिली आहेत;


राजाने दानिएलास म्हटले, “तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्ये प्रकट करणारा देव आहे.”


जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही,


हे कोकर्‍याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांना जिंकील, कारण तो ‘प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे;’ आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत.”


त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan