Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 7:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 एज्रा याजक शास्त्री असून परमेश्वराची आज्ञावचने व त्याने इस्राएलास विहित केलेले नियम ह्यांत पारंगत होता; त्याला अर्तहशश्त राजाने जे पत्र दिले त्याची नक्कल ही :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 राजा अर्तहशश्ताने, एज्रा, जो याजक व जो परमेश्वर देवाने इस्राएलांस दिलेल्या नियमशास्त्राचा शिक्षक होता, त्यास दिलेला हा आदेश होय;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 ही पत्राची प्रत आहे जी अर्तहशश्त राजाने नियमशास्त्राचा शिक्षक आणि इस्राएलसाठी याहवेहच्या आज्ञा आणि नियमांचा अभ्यासक एज्रा याजकाला दिली होती:

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 7:11
9 Iomraidhean Croise  

अर्तहशश्त राजाला त्यांनी पत्र पाठवले त्याची नक्कल ही : “नदीच्या पश्‍चिमेकडील आपले सेवक इत्यादी -


महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनइ व त्या नदाच्या पश्‍चिमेकडचे शथर-बोजनइ व त्याचे स्नेही अफर्सखी ह्यांनी दारयावेश राजाकडे पत्र पाठवले त्याची नक्कल ही;


परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्राएलास त्यातले नियम व निर्णय शिकवण्याचा एज्राने निश्‍चय केला होता.


“स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री एज्रा याजक ह्याला राजाधिराज अर्तहशश्त इत्यादी;


मी अर्तहशश्त राजा महानदाच्या पश्‍चिमेकडील सर्व भांडार्‍यांस अशी आज्ञा करीत आहे की, एज्रा याजक जो स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत आहे तो जे काही तुमच्याकडे मागेल ते सर्व ताबडतोब त्याला द्यावे;


हाच एज्रा बाबेलहून गेला; हा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता; त्याचा देव परमेश्वर ह्याचा वरदहस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सर्व मनोरथ पूर्ण केला.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


“शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan