Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ह्यानंतर पारसाचा राजा अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीत एज्रा बिन सराया बिन अजर्‍या बिन हिल्कीया

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यानंतर, पारसाचा राजा अर्तहशश्त याच्या कारकीर्दीत, एज्रा, जो सरायाचा मुलगा, अजऱ्याचा मुलगा, हिल्कीयाचा मुलगा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 या घटना घडल्यानंतर, पर्शियाचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीत एज्रा, जो सेरायाहचा पुत्र होता. सेरायाह हा अजर्‍याहाचा पुत्र होता. अजर्‍याह हा हिल्कियाहचा पुत्र होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 7:1
19 Iomraidhean Croise  

त्याने त्याला सांगितले, “जा, मुख्य याजक हिल्कीया ह्याला सांग की जो पैसा परमेश्वराच्या मंदिरी आलेला आहे व द्वारपाळांनी लोकांपासून जमवला आहे त्याचा हिशोब करा.


मुख्य याजक हिल्कीया ह्याने शाफान चिटणीस ह्याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” हिल्कीयाने तो ग्रंथ शाफानास दिला व त्याने तो वाचला.


गारद्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व तीन द्वारपाळ ह्यांना पकडून नेले.


आणि अजर्‍या बिन हिल्कीया, बिन मशुल्लाम, बिन सादोक, बिन मरायोथ, बिन अहीटूब; हा देवाच्या मंदिराचा शास्ता होता;


हिल्कीयाने शाफान चिटणीस ह्याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने तो ग्रंथ शाफानास दिला.


ते मुख्य याजक हिल्कीया ह्याच्याकडे गेले आणि द्वारपाळ लेवी ह्यांनी मनश्शे, एफ्राईम, इस्राएलाचे अवशिष्ट लोक, सर्व यहूदा व बन्यामीन आणि यरुशलेमनिवासी ह्या सर्वांकडून जो पैसा लेव्यांनी जमा करून देवाच्या मंदिरात आणला होता तो त्यांनी त्याच्या स्वाधीन केला.


अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीत बिश्‍लाम, मिथ्रदाथ, ताबेल व त्यांचे वरकड स्नेही ह्यांनी पारसाच्या राजाला पत्र लिहून पाठवले; हे पत्र अरामी लिपीत व अरामी भाषेत लिहिले होते.


हाग्गय संदेष्टा आणि जखर्‍या बिन इद्दो ह्यांच्या संदेशामुळे यहूदी वडील जन मंदिर बांधत राहिले आणि त्यात त्यांना यश आले. इस्राएलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दारयावेश व अर्तहशश्त ह्यांच्या फर्मानांबरहुकूम त्यांनी ते मंदिर बांधून पुरे केले.


परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्राएलास त्यातले नियम व निर्णय शिकवण्याचा एज्राने निश्‍चय केला होता.


“स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री एज्रा याजक ह्याला राजाधिराज अर्तहशश्त इत्यादी;


बिन शल्लूम बिन सादोक बिन अहीटूब


मी अर्तहशश्त राजा महानदाच्या पश्‍चिमेकडील सर्व भांडार्‍यांस अशी आज्ञा करीत आहे की, एज्रा याजक जो स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत आहे तो जे काही तुमच्याकडे मागेल ते सर्व ताबडतोब त्याला द्यावे;


सराया बिन हिल्कीया बिन मशुल्लाम बिन सादोक बिन मरायोथ बिन अहीटूब हा देवमंदिराचा अधिकारी होता;


अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात राजापुढे द्राक्षारस ठेवलेला होता तो मी उचलून राजाला दिला. ह्यापूर्वी मी कधीही त्याच्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो.


मग ते सर्व लोक एकचित्त होऊन पाणीवेशीजवळच्या चौकात एकत्र जमले व एज्रा शास्त्री ह्याला म्हणाले, “परमेश्वराने इस्राएल लोकांना विहित केलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan