Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ह्याखेरीज हे देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहूद्यांच्या वडील जनांशी तुमचे काय कर्तव्य आहे ह्याविषयी मी तुम्हांला अशी आज्ञा करतो की राजधनातून म्हणजे अर्थात महानदाच्या पश्‍चिम प्रांतांच्या करामधून ह्या लोकांना खर्च ताबडतोब पुरवावा; त्यांना काही अडथळा करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आता माझा आदेश असा आहे. देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहूदी वडीलजनांसाठी पूर्ण खर्च राजाच्या निधीतून नदीच्या पलीकडील येणाऱ्या खंडणीतून त्या मनुष्यांना देण्यासाठी वापरावा. यासाठी की, त्यांनी त्यांचे काम थांबवू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 एवढेच नव्हे, तर परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाकरिता यहूद्यांच्या मदतीसाठी हे करण्याची मी तुम्हाला आज्ञा देतो: मंदिर बांधण्यास येणारा सर्व खर्च फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाच्या राजकीय खजिन्यातून त्यांच्या मागणीनुसार देण्यात यावा, जेणेकरून कामास विलंब होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 6:8
15 Iomraidhean Croise  

आम्ही महाराजांना हे निक्षून सांगतो की, हे नगर बांधण्यात आले व ह्याचे कोट बांधून तयार झाले तर महानदाच्या पश्‍चिमेकडे आपला काहीच मुलुख राहायचा नाही.”


अर्तहशश्त राजाचे हे पत्र रहूम, शिमशय लेखक व त्यांचे स्नेही ह्यांना वाचून दाखवले, तेव्हा ते त्वरा करून यरुशलेमेस यहूद्यांकडे गेले आणि जुलमाने व जबरीने त्यांनी त्यांचे काम थांबवले.


तरीपण यहूद्यांच्या वडील जनांवर त्यांच्या देवाची कृपादृष्टी असे, म्हणून ही गोष्ट दारयावेशाच्या कानी जाऊन तिकडून त्यासंबंधाने लेखी उत्तर येईपर्यंत त्यांनी त्या कामास अडथळा केला नाही.


हाग्गय संदेष्टा आणि जखर्‍या बिन इद्दो ह्यांच्या संदेशामुळे यहूदी वडील जन मंदिर बांधत राहिले आणि त्यात त्यांना यश आले. इस्राएलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दारयावेश व अर्तहशश्त ह्यांच्या फर्मानांबरहुकूम त्यांनी ते मंदिर बांधून पुरे केले.


त्याचे तीन थर मोठमोठ्या पाषाणांचे व एक थर नव्या लाकडांचा असावा; हा सर्व खर्च राजाच्या खजिन्यातून करण्यात यावा.


देवाच्या मंदिराचे काम चालू द्या; यहूद्यांचा अधिपती व त्यांचे वडील जन ह्यांनी हे देवाचे मंदिर त्याच्याच पूर्वीच्या जागी बांधावे.


स्वर्गीच्या देवास होमार्पणांसाठी गोर्‍हे, मेंढे, कोकरे आदिकरून ज्या वस्तू लागतील त्या आणि गहू, मीठ, द्राक्षारस व तेल, हे यरुशलेमेतील याजक जितके मागतील तितके प्रतिदिनी त्यांना द्यावे; ह्यात काही खंड पडू नये;


तुझ्याजवळ देवाचे जे नियमशास्त्र आहे त्यानुसार यहूदा व यरुशलेम ह्यांची स्थिती आहे किंवा कसे ह्याचा तपास करावा म्हणून राजा व त्याचे सात मंत्री ह्यांच्याकडून तुला रवाना करण्यात येत आहे;


कारण त्यांच्यासंबंधाने राजाची आज्ञा होती व रोजच्या जरुरीप्रमाणे गाणार्‍यांची व्यवस्था ठरली होती.


आणि महाराजांच्या जंगलाचा अधिपती आसाफ ह्याला असे पत्र द्यावे की मंदिराच्या गढीच्या दरवाजांसाठी तुळया काढण्यासाठी, शहराच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावीत.” माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली.


मी फर्मावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे; कारण तो जिवंत देव आहे; तो सर्वकाळ जवळ आहे; त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे.


रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan