Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 6:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याचे तीन थर मोठमोठ्या पाषाणांचे व एक थर नव्या लाकडांचा असावा; हा सर्व खर्च राजाच्या खजिन्यातून करण्यात यावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मोठ्या दगडांचे तीन थर आणि मोठ्या लाकडाचा एक थर असावा. त्याचा खर्च राजाच्या घरातून केला जावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 पायांमध्ये मोठ्या दगडांचे तीन थर असतील व त्यांच्यावर एक लाकडाचा थर असेल. त्याचा सर्व खर्च राजकीय खजिन्यातून दिला जाईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 6:4
10 Iomraidhean Croise  

त्याने आतले अंगण बांधले होते त्याला चिर्‍यांच्या तीन रांगा व गंधसरूच्या तुळयांची एक रांग लावली होती.


त्यांनी पाथरवटांना व सुतारांना पैसा दिला आणि पारसाचा राजा कोरेश ह्याच्या परवान्याने गंधसरूची लाकडे लबानोनाहून याफोला जलमार्गाने पोचती करावी म्हणून त्यांनी सीदोनी व सोरी लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तू व तेल दिले. मंदिराच्या पुनर्रचनेची सुरुवात


महाराजांना कळावे की आम्ही यहूदा प्रांतातील थोर देवाच्या मंदिराकडे गेलो होतो; तेथे पाहतो तर ते मोठ्या पाषाणाचे बांधत आहेत व भिंतीवर लाकडेही पडली आहेत; हे काम मोठ्या झपाट्याने चालले असून त्यांच्या हातांनी सिद्धीस जात आहे;


ह्याखेरीज हे देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहूद्यांच्या वडील जनांशी तुमचे काय कर्तव्य आहे ह्याविषयी मी तुम्हांला अशी आज्ञा करतो की राजधनातून म्हणजे अर्थात महानदाच्या पश्‍चिम प्रांतांच्या करामधून ह्या लोकांना खर्च ताबडतोब पुरवावा; त्यांना काही अडथळा करू नये.


यरुशलेमातील तुझ्या मंदिरासाठी राजे तुला भेटी आणतील.


तार्शीश व द्वीपे ह्यांचे राजे खंडणी देवोत, शबा व सबा ह्यांचे राजे नजराणे आणोत.


राजे बापासमान तुझे पालक होतील, त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील; ती तुला भूमीपर्यंत लवून नमन करतील. तुझ्या पायांची धूळ चाटतील; तेव्हा मी परमेश्वर आहे, माझी आस धरणारे फजीत होत नाहीत, असे तुला कळून येईल.”


परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले; तिने ‘आपले तोंड उघडून’ अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी ‘गिळून टाकली.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan