एज्रा 6:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ‘कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यरुशलेमेतील देवाच्या मंदिरासंबंधाने राजाने जो ठराव केला तो असा : ज्या स्थानी यज्ञ करतात तेथे देवाचे मंदिर बांधावे व त्याचा पाया खंबीर घालावा; त्याची उंची साठ हात व रुंदी साठ हात असावी; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 “कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यरूशलेममधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की, जेथे यज्ञ अर्पण करीत त्याठिकाणी देवाचे मंदिर बांधावे. ‘मंदिराचा पाया बांधून काढावा. त्याच्या भिंतीची उंची साठ हात आणि रुंदी साठ हात असावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, यरुशलेम येथील परमेश्वराच्या मंदिरासंबंधी एक हुकूमनामा पाठविला गेला होता: तिथे अर्पणे करण्याकरिता ते मंदिर परत बांधले जावे आणि त्याची पायाभरणी करावी. त्याची उंची साठ हात व रुंदी साठ हात असावी. Faic an caibideil |