Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 6:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस आनंदाने पाळला, कारण परमेश्वराने त्यांना आनंदित केले होते आणि इस्राएलाचा देव ह्याच्या मंदिराच्या कामी त्यांच्या हातांना जोर यावा म्हणून त्याने अश्शूरच्या राजाचे मन त्यांना अनुकूल केले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 बेखमीर भाकरीचा सण त्यांनी उत्साहाने सात दिवस साजरा केला. कारण देवाच्या, इस्राएलाच्या देवाच्या मंदिराच्या कामात त्यांचे हात मजबूत करायला परमेश्वराने अश्शूरच्या राजाचे मन त्यांच्याकडे फिरवून त्यांना आनंदीत केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 बेखमीर भाकरीचा सण सात दिवस हर्षभराने पाळण्यात आला. सर्व देशभर आनंदोत्सव होता, कारण याहवेहने अश्शूरच्या राजाला इस्राएलाशी कनवाळूपणे वागण्यास आणि इस्राएलाच्या परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामामध्ये मदत करण्यास प्रवृत्त केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 6:22
20 Iomraidhean Croise  

त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस मिसर देशाचा राजा फारो-नखो हा अश्शूराच्या राजावर चढाई करून फरात महानदापर्यंत गेला असताना योशीया राजा त्याच्यावर चालून गेला; योशीया मगिद्दो येथे त्याच्यासमोर आला तेव्हा त्याला त्याने ठार केले.


मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे, त्याप्रमाणे व दाविदाने नेमून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराला होमबली अर्पून आनंदाने गायन करावे म्हणून दाविदाने लेवीय याजकांची परमेश्वराच्या मंदिरात वाटणी करून दिली होती, त्यांच्या हाती यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराचे अधिकार सोपवले.


मग हिज्कीया राजा व सरदार ह्यांनी लेव्यांना आज्ञा केली की दावीद व आसाफ द्रष्टा ह्यांची कवने गाऊन परमेश्वराची स्तुती करा. तेव्हा त्यांनी आनंदाने स्तुती केली व आपली मस्तके लववून आराधना केली.


जे इस्राएल लोक यरुशलेमेत हजर होते त्यांनी सात दिवसपर्यंत बेखमीर भाकरीचा सण मोठ्या आनंदाने पाळला आणि प्रतिदिनी लेवी व याजक परमेश्वराप्रीत्यर्थ महानादाची वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करीत होते.


ह्यास्तव परमेश्वराने त्यांच्यावर अश्शूरच्या राजाचे सेनानायक पाठवले. त्यांनी मनश्शेस आकड्यांनी पकडून व बेड्या घालून बाबेलास नेले.


त्या प्रसंगी जे इस्राएल लोक हजर होते त्यांनी वल्हांडण सण पाळला आणि सात दिवस बेखमीर भाकरीचा सण पाळला.


यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने ह्या राजाच्या मनास स्फूर्ती दिली; तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले व लेखी फर्मानही पाठवले, ते असे :


दारयावेश राजाच्या हुकमावरून बाबेल येथील दप्तरखान्यात व जामदारखान्यात शोध करण्यात आला.


यरुशलेमेतील देवाचे मंदिर शोभिवंत करावे अशी इच्छा राजाच्या मनात ज्याने उत्पन्न केली आहे तो आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर धन्य!


एवढा सगळा वेळ मी यरुशलेमेत राहत नव्हतो; बाबेलचा राजा अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी त्याच्याकडे गेलो आणि मग काही दिवसांनी मी राजाकडे रजा मागितली;


मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करायला लावतो.


राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.


बाबेलचे पुरुष, सर्व खास्दी, पकोड, शोआ व कोआ येथले लोक व अश्शूरी पुरुष, जे सर्व मनोहर तरुण, अधिपती व नायब अधिपती, वीर व मंत्री व शिलेदार आहेत; त्यांना तुझ्यावर आणीन.


नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “आपणाकरता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?”


येशूने उत्तर दिले, “आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता; म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan