Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 6:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तेव्हा इस्राएल लोक म्हणजे याजक, लेवी व बंदिवासातून परत आलेले लोक ह्यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहाने केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 इस्राएल लोकांनी, याजक, लेवी, बंदिवासातून आलेले यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना आनंदाने केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 याजकांनी, लेव्यांनी व सर्व इस्राएली लोकांनी अत्यंत हर्षाने मंदिराचा समर्पणविधी साजरा केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 6:16
21 Iomraidhean Croise  

मग राजाने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञबली अर्पण केले.


शलमोनाने शांत्यर्पणासाठी परमेश्वरापुढे अर्पण केलेले बळी बावीस हजार बैल आणि एक लाख वीस हजार मेंढरे होती. अशा रीतीने राजाने व सर्व इस्राएलांनी परमेश्वराच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले.


ह्या प्रकारे सगळ्या इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश जयजयकार करीत, रणशिंग, कर्णे व झांजा वाजवीत आणि सतारी व वीणा ह्यांचा नाद काढत समारंभाने वर आणला.


जे प्रथम आपल्या वतनाच्या नगरात राहण्यास आले ते इस्राएल, याजक, लेवी व नथीनीम हे होते.


मग हिज्कीया राजा व सरदार ह्यांनी लेव्यांना आज्ञा केली की दावीद व आसाफ द्रष्टा ह्यांची कवने गाऊन परमेश्वराची स्तुती करा. तेव्हा त्यांनी आनंदाने स्तुती केली व आपली मस्तके लववून आराधना केली.


मग सर्व मंडळीने असा विचार केला की आणखी सात दिवस उत्सव करावा आणि ह्याप्रमाणे त्यांनी आणखी सात दिवस आनंदाने पाळले.


यरुशलेमेत फार आनंद झाला; इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन ह्याच्या वेळेपासून असा उत्सव यरुशलेमेत कधी झाला नव्हता.


शलमोन राजाने बावीस हजार बैल व एक लक्ष वीस हजार मेंढरे ह्यांचा यज्ञ केला. अशा रीतीने राजाने व सर्व लोकांनी देवाचे मंदिर समर्पित केले.


बंदिवासातून आलेले लोक इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधत आहेत असे यहूदा व बन्यामीन ह्यांच्या शत्रूंनी ऐकले,


त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस आनंदाने पाळला, कारण परमेश्वराने त्यांना आनंदित केले होते आणि इस्राएलाचा देव ह्याच्या मंदिराच्या कामी त्यांच्या हातांना जोर यावा म्हणून त्याने अश्शूरच्या राजाचे मन त्यांना अनुकूल केले होते.


यरुशलेमेच्या कोटाच्या समर्पणाच्या वेळी लेव्यांनी आनंद व धन्यवाद करून झांजा, सारंग्या व वीणा वाजवून आणि गाऊन तो प्रसंग साजरा करावा म्हणून त्यांना यरुशलेमेत पोचवण्यासाठी त्यांच्या-त्यांच्या स्थानांतून शोधून काढले.


त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण त्यांनी आनंदीआनंद करावा असे देवाने केले होते; बायकामुलांनीही आनंद केला; यरुशलेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहचला.


ह्या प्रकारे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व इतर काही लोक; नथीनीम व सर्व इस्राएल आपापल्या नगरांत राहू लागले. सातवा महिना आला तेव्हा सर्व इस्राएल आपापल्या नगरात होते.


तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”


“आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ” असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.


तेव्हा दानिएलास राजापुढे आणले. राजा त्याला म्हणाला, “माझा बाप, जो राजा, त्याने यहूदातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानीएल तो तूच काय?


तेव्हा यरुशलेमेत पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता;


तेथे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर भोजन करावे आणि ज्या ज्या कामात तुम्ही हात घातला व ज्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला यश दिले त्या सर्वांबद्दल तुम्ही व तुमच्या घरच्या माणसांनी आनंद करावा.


प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan