Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 6:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 दायरावेश राजाच्या ह्या फर्मानाप्रमाणे महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनइ, शथर-बोजनइ व त्यांचे स्नेही ह्यांनी ताबडतोब केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 नदीच्या पलीकडील अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती यांनी राजा दारयावेशाच्या आदेशाच्या प्रत्येक गोष्टीचे पालन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाचा राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी दारयावेश राजाच्या या हुकुमाची अंमलबजावणी तातडीने केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 6:13
9 Iomraidhean Croise  

अर्तहशश्त राजाचे हे पत्र रहूम, शिमशय लेखक व त्यांचे स्नेही ह्यांना वाचून दाखवले, तेव्हा ते त्वरा करून यरुशलेमेस यहूद्यांकडे गेले आणि जुलमाने व जबरीने त्यांनी त्यांचे काम थांबवले.


त्या प्रसंगी रहूम राजमंत्री, शिमशय लेखक व त्यांचे वरकड स्नेही म्हणजे दिनाई, अफर्सथखी, टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, शूशनखी, देहावी, एलामी,


त्या वेळेस महानदाच्या पश्‍चिमेकडच्या प्रांताचा अधिपती ततनइ व शथर-बोजनइ व त्यांचे स्नेही हे सर्व त्यांच्याकडे येऊन म्हणाले, “हे मंदिर बांधण्याचा व हा कोट उभारण्याचा हुकूम तुम्हांला कोणी दिला आहे?”


महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनइ व त्या नदाच्या पश्‍चिमेकडचे शथर-बोजनइ व त्याचे स्नेही अफर्सखी ह्यांनी दारयावेश राजाकडे पत्र पाठवले त्याची नक्कल ही;


‘तर आता महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे स्नेही अफर्सखी असे तुम्ही तेथून दूर व्हा;


हामानाने तो पोशाख व तो घोडा घेऊन मर्दखयाला सजवले आणि शहराच्या रस्त्यातून त्याला मिरवून त्याच्यापुढे ललकारले की, “राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची ह्या प्रकारे संभावना होईल.”


अधिपतीची मर्जी संपादण्यास पुष्कळ लोक झटतात; पण मनुष्याचा निवाडा करणारा परमेश्वर आहे.


राजाचा शब्द तर प्रबळ असतो; “तू हे काय करतोस,” असे त्याला कोण म्हणेल?


Lean sinn:

Sanasan


Sanasan