Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 6:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 यरुशलेमेतील देवाच्या ह्या मंदिराचा विध्वंस करावा ह्या उद्देशाने ह्या आज्ञेत जे कोणी खटपटी करतील व जे कोणी राजे किंवा लोक ती फिरवावी म्हणून तीत हात घालतील त्या सर्वांचा निःपात ज्या देवाने तेथे आपल्या नामाचा निवास केला आहे तो करील; मी दारयावेश हा हुकूम करीत आहे त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 यरूशलेमेतील देवाच्या या मंदिराचा नाश करण्यास किंवा उल्लंघन करणारा जो कोणी राजा असो किंवा लोक आपले हात लावतील त्यांचा नाश जो देव तेथे राहतो तो करील. मी दारयावेश हा हुकूम करीत आहे. तो पूर्णपणे पाळावा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 ज्या परमेश्वराने त्यांच्या नावाचे वसतिस्थान व्हावे यासाठी यरुशलेम नगरी निवडली आहे, ते हा हुकूम बदलणार्‍या व मंदिराचा नाश करणार्‍या कोणत्याही राजाचा आणि लोकांचा सर्वनाश करतील. मी, दारयावेशने हे फर्मान काढले आहे व त्याची अंमलबजावणी तत्परतेने व्हावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 6:12
24 Iomraidhean Croise  

परमेश्वर त्याला म्हणाला, “तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनवणी मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहेस त्याला माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे; माझी दृष्टी व माझे चित्त त्यावर सतत राहील.


ह्या मंदिरी माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे; माझे नेत्र व माझे मन हे येथे सतत लागलेले राहील.


दायरावेश राजाच्या ह्या फर्मानाप्रमाणे महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनइ, शथर-बोजनइ व त्यांचे स्नेही ह्यांनी ताबडतोब केले.


हाग्गय संदेष्टा आणि जखर्‍या बिन इद्दो ह्यांच्या संदेशामुळे यहूदी वडील जन मंदिर बांधत राहिले आणि त्यात त्यांना यश आले. इस्राएलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दारयावेश व अर्तहशश्त ह्यांच्या फर्मानांबरहुकूम त्यांनी ते मंदिर बांधून पुरे केले.


आणि यरुशलेमनिवासी जो इस्राएलाचा देव त्याला राजाने व त्याच्या मंत्र्यांनी स्वसंतोषाने अर्पण केलेले सोने व रुपे तू न्यावेस;


तू त्या पैशांचे बैल, मेंढे, कोकरे, व त्यांबरोबरची अन्नार्पणे व पेयार्पणे ही हयगय न करता खरेदी करून यरुशलेमेतील तुमच्या देवाच्या मंदिरात असलेल्या वेदीवर अर्पण करावीत.


जे कोणी तुझ्या देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे आणि राजाच्या कायद्याप्रमाणे वागणार नाहीत त्यांना ताबडतोब शासन करावे; प्राणदंड, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती अथवा कैद ह्यांतील कोणतीही शिक्षा त्यांना करावी.”


डाकेच्या स्वारांनी सरकारी वेगवान घोड्यांवर स्वार होऊन राजाज्ञेप्रमाणे त्वरेने दौड केली; हा हुकूम शूशन राजवाड्यातून सोडण्यात आला.


हे देवा, त्यांना दोषी ठरव; ते आपल्या मसलतींत फसोत; त्यांच्या अनेक अपराधांबद्दल त्यांना झुगारून दे, कारण ते तुला जुमानत नाहीत;


माझ्यासाठी एक मातीची वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे कर, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन.


जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही.


कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विलयास जाईल; अशी राष्ट्रे खातरीने उद्ध्वस्त होतील.


तू आपला भाऊ याकोब ह्याच्यावर गहजब केलास म्हणून लज्जेने तू व्याप्त होशील, व तुला कायमचे नष्ट करतील.


तेव्हा तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे; [काट्यावर लाथ मारणे हे तुला कठीण.


तेव्हा जे स्थळ तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथेच मी तुम्हांला सांगतो त्या सगळ्या वस्तू आणा : आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे आणि तुम्ही परमेश्वराला कराल ते सर्व विशिष्ट नवस.


पण तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाची स्थापना करण्यासाठी तुमच्या सर्व वंशांच्या वतनातून जे स्थान निवडून घेईल तेथे त्याच्या निवासस्थानी तुम्ही त्याला शरण जा व तेथेच जात जा;


परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी शेरडेमेंढरे आणि गाईबैल ह्यांतून वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan