Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 6:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मी आणखी असाही हुकूम करतो की जो कोणी ह्या आज्ञेत कमीजास्त करील त्याच्या घराचे बहाल (लाकूड) काढून त्यावर त्या माणसास उचलून टांगावे आणि ह्या अपराधाबद्दल त्याच्या घराचा उकिरडा करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मी तुम्हास आज्ञा करतो की, जो कोणी माझ्या आज्ञेचे उल्लंघन करील त्याच्या घराचे लाकूड काढून त्याच्यावर त्यास टांगावे. त्या अपराधामुळे त्याचे घर कचऱ्याचा ढिग करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 कोणी या संदेशातील मजकूर कोणत्याही प्रकारे बदलण्याचा प्रयत्न करेल, तर त्याच्या घराच्या तुळया उपसून काढल्या जातील व त्या तुळयांवर त्याला फाशी देण्यात येईल आणि त्याच्या घराचा उकिरडा केला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 6:11
7 Iomraidhean Croise  

त्यांनी बआलाच्या मूर्तीस्तंभाचा भंग केला, आणि त्याचे देऊळ मोडून त्याचे शौचकूप केले; ते आजवर आहे.


ईजबेलीचे शव इज्रेलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील, ही ईजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही.”’


जे कोणी तुझ्या देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे आणि राजाच्या कायद्याप्रमाणे वागणार नाहीत त्यांना ताबडतोब शासन करावे; प्राणदंड, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती अथवा कैद ह्यांतील कोणतीही शिक्षा त्यांना करावी.”


एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपणासाठी जे भोजन तयार केले आहे त्याला आपण हामानास घेऊन यावे.”


तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले.


राजाने खास्द्यांना म्हटले की, “माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ मला तुम्ही कळवला नाही, तर तुमचे तुकडे-तुकडे करून तुमची घरे उकिरडे करावेत.


ह्याकरता मी फर्मावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, ह्यांपैकी जे कोणी शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे-तुकडे करण्यात येतील; त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील; कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan