एज्रा 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 महाराजांना कळावे की आम्ही यहूदा प्रांतातील थोर देवाच्या मंदिराकडे गेलो होतो; तेथे पाहतो तर ते मोठ्या पाषाणाचे बांधत आहेत व भिंतीवर लाकडेही पडली आहेत; हे काम मोठ्या झपाट्याने चालले असून त्यांच्या हातांनी सिद्धीस जात आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे राजा, आम्ही यहूदा प्रांतात महान परमेश्वराच्या मंदिराकडे गेलो. यहूदातील लोक मोठे दगड वापरुन हे मंदिर नव्याने बांधित आहेत. भिंतीत लांबरुंद लाकडे घालत आहेत. यहूदी लोक हे काम मोठया झपाट्याने आणि मेहनत घेऊन करत आहेत. ते झटून काम करीत असल्यामुळे लवकरच बांधकाम पुरे होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आमची राजाला हे कळविण्याची इच्छा आहे की, आम्ही यहूदीयाच्या महान परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीच्या जागी गेलो. ते मंदिर मोठमोठ्या पाषाणांनी बांधले जात आहे आणि भिंतीत लाकडे घातली जात आहेत. त्यांच्या देखरेखीखाली बांधकामाची अतिशय उत्साहाने आणि यशस्वी रीतीने प्रगती होत आहे. Faic an caibideil |