Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तरीपण यहूद्यांच्या वडील जनांवर त्यांच्या देवाची कृपादृष्टी असे, म्हणून ही गोष्ट दारयावेशाच्या कानी जाऊन तिकडून त्यासंबंधाने लेखी उत्तर येईपर्यंत त्यांनी त्या कामास अडथळा केला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तरीही यहूदी नेत्यांवर देवाची कृपादृष्टी होती. त्यामुळे राजा दारयावेशाला ही खबर लेखी कळवून त्याचे उत्तर येईपर्यंत त्यांना मंदिराचे काम थांबवता आले नाही आणि बांधकाम चालूच राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 पण त्यांच्या परमेश्वराची नजर यहूदी वडीलजन त्यांच्यावर होती, दारयावेश राजा त्याचे उत्तर देईपर्यंत त्यांचे काम त्यांना थांबविता आले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 5:5
12 Iomraidhean Croise  

परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. हा तू मूर्खपणा केलास म्हणून ह्यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.”


राजा, त्याचे मंत्री व राजाचे सर्व पराक्रमी सरदार ह्यांची माझ्यावर दया व्हावी असे देवाने केले आहे. माझा देव परमेश्वर ह्याचा माझ्यावर वरदहस्त होता. त्यामुळे हिंमत धरून माझ्याबरोबर जाण्यासाठी इस्राएलातील प्रमुख पुरुष मी एकत्र केले.


हाच एज्रा बाबेलहून गेला; हा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता; त्याचा देव परमेश्वर ह्याचा वरदहस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सर्व मनोरथ पूर्ण केला.


वाटेने शत्रूंपासून आमचा बचाव होण्यासाठी राजाकडे शिपाई व घोडेस्वार ह्यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली; कारण आम्ही राजाला असे बोलून चुकलो होतो की, “आमच्या देवाला शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरदहस्त असतो, पण जे त्याचा त्याग करतात त्यांच्यावर त्याचे बल व त्याचा क्रोध ही प्रकट होतात.”


मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.


पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात,


परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.


कारण मनुष्याचा क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असा होतो; अवशिष्ट क्रोधाने तू आपली कंबर बांधतोस.


आणि विरोध करणार्‍या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाहीत; हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे, आणि ते देवापासून आहे.


कारण ‘परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात; तरी वाईट करणार्‍यावर परमेश्वराची करडी नजर आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan