Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 जरूब्बाबेल बिन शल्तीएल आणि येशूवा बिन योसादाक हे तयार होऊन यरुशलेमेतील देवाचे मंदिर बांधू लागले; देवाचे संदेष्टे त्यांना साहाय्य करीत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकाचा मुलगा येशूवा यांनी यरूशलेममधील मंदिराच्या कामाला सुरुवात केली, देवाच्या सर्व संदेष्ट्यांनी त्यांना उत्तेजन दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मग शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व योसादाकाचा पुत्र येशूआ यांनी यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले. आणि परमेश्वराच्या संदेष्ट्यांनी त्यांच्याबरोबर राहून त्यांना साहाय्य केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 5:2
16 Iomraidhean Croise  

पारसाचा राजा कोरेश ह्याने ती मिथ्रदाथ भांडारी ह्याच्या हस्ते बाहेर काढून यहूदाचा सरदार शेशबस्सर ह्याला मोजून दिली.


याजक वंशातील ज्या पुरुषांनी अन्य जातींच्या स्त्रिया केल्या होत्या ते हे : येशूवा बिन योसादाक ह्याच्या वंशातील व त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलियेजर, यारीब व गदल्या.


तेव्हा येशूवा बिन योसादाक व त्याचे बांधव जे याजक आणि जरूब्बाबेल बिन शल्तीएल व त्याचे बांधव ह्यांनी उभे राहून देवाचा माणूस मोशे ह्याच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे होमार्पणे करण्यासाठी इस्राएलाच्या देवाची वेदी बांधली.


यरुशलेमेतील देवाच्या मंदिराप्रत आल्यावर दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्यात जरूब्बाबेल बिन शल्तीएल, येशूवा बिन योसादाक व त्यांचे इतर बांधव जे याजक व लेवी होते त्यांनी आणि जे बंदिवासातून यरुशलेमेस आले होते त्या सर्वांनी कामास आरंभ केला; वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जे लेवी होते त्यांना परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले.


हाग्गय संदेष्टा आणि जखर्‍या बिन इद्दो ह्यांच्या संदेशामुळे यहूदी वडील जन मंदिर बांधत राहिले आणि त्यात त्यांना यश आले. इस्राएलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दारयावेश व अर्तहशश्त ह्यांच्या फर्मानांबरहुकूम त्यांनी ते मंदिर बांधून पुरे केले.


ह्यास्तव आजपासून मागच्या म्हणजे नवव्या महिन्याच्या चोविसाव्या तारखेस परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला त्या मागच्या काळाकडे लक्ष पुरवा.


तेव्हा त्याने म्हटले, “अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे हे दोन अभिषिक्त आहेत.”


तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्‍या दिव्यदूताला मी विचारले, “माझ्या प्रभो, ही काय आहेत?


सोनेरुपे घेऊन मुकुट घडव व तो यहोसादाकाचा पुत्र यहोशवा मुख्य याजक ह्याच्या मस्तकी घाल.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “सेनाधीश परमेश्वराचे मंदिर बांधावे म्हणून त्याचा पाया घातला त्या वेळच्या संदेष्ट्यांची ही वचने ह्या दिवसांत जे तुम्ही ऐकत आहात, ते तुम्ही आपले हात दृढ करा.


आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवतो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहोत; तुमची स्थिती आहे ती विश्वासाने आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan