एज्रा 5:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग शेशबस्सराने येऊन यरुशलेमेतल्या देवमंदिराचा पाया घातला; तेव्हापासून आजवर हे बांधण्याचे काम चालू आहे, अद्यापि हे पुरे झाले नाही.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा शेशबस्सरने यरूशलेमात येऊन मंदिराचा पाया घातला आणि तेव्हापासून आजतागायत ते काम चाललेले आहे पण अजून पूर्ण झालेले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “म्हणून शेशबस्सर आला व त्याने यरुशलेमच्या मंदिराची पायाभरणी केली त्या वेळेपासून लोक मंदिराचे बांधकाम करीत आहेत, पण ते अद्यापही पूर्ण झालेले नाही.” Faic an caibideil |
यरुशलेमेतील देवाच्या मंदिराप्रत आल्यावर दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्यात जरूब्बाबेल बिन शल्तीएल, येशूवा बिन योसादाक व त्यांचे इतर बांधव जे याजक व लेवी होते त्यांनी आणि जे बंदिवासातून यरुशलेमेस आले होते त्या सर्वांनी कामास आरंभ केला; वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जे लेवी होते त्यांना परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले.