Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 5:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आमच्या वाडवडिलांनी स्वर्गीच्या देवाला चिडवून संतप्त केले तेव्हा त्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर खास्दी ह्याच्या हाती दिले; त्याने ह्या मंदिराचा विध्वंस करून येथील लोकांना बाबेलास नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने स्वर्गातील देवाला चिडवून संतप्त केले. तेव्हा त्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर खास्दी याच्या हाती दिले आणि त्याने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकांस कैद करून बाबेलला नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 कारण आमच्या पूर्वजांनी स्वर्गाच्या परमेश्वराला संतप्त केले, म्हणून त्यांनी आमच्या लोकांना बाबेलचा खाल्डियन राजा नबुखद्नेस्सरच्या अधीन केले, ज्याने मंदिराचाही नाश केला व लोकांना बाबेलच्या बंदिवासात नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 5:12
28 Iomraidhean Croise  

परमेश्वराने आपले सेवक संदेष्टे ह्यांच्या द्वारे सांगितलेल्या वचनाप्रमाणे यहूदाचा नाश करावा म्हणून त्याच्यावर खास्दी, अरामी, मवाबी व अम्मोनी ह्यांच्या टोळ्या पाठवल्या.


त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यातील दशमीस बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपली सर्व सेना घेऊन यरुशलेमेवर चढाई करून आला; त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढेकोट उभारले.


जे तलवारीच्या तडाख्यातून वाचले त्या सर्वांना तो राजा बाबेलास घेऊन गेला; पारसाचे राज्य स्थापित होईपर्यंत ते त्याचे व त्याच्या वंशजांचे दास होऊन राहिले;


त्यामुळे परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला; त्याला आपल्या वतनाचा वीट आला.


मी आपल्या लोकांवर रुष्ट झालो, मी आपले वतन अपवित्र केले; त्यांना तुझ्या हाती दिले. तू त्यांच्यावर किमपि दया केली नाहीस, वृद्धांवर तू आपले भारी जू लादलेस.


परमेश्वर म्हणतो ह्या गोष्टींबद्दल मी त्यांचा समाचार नाही का घेणार? माझा आत्मा ह्या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार?”


यहूदाचा राजा सिद्कीया आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलास गेला, त्याच्याबरोबर सराया बिन नेरीया बिन मासेया गेला होता. त्याला यिर्मया संदेष्ट्याने जे आज्ञावचन सांगितले ते हे. सराया बिनीवाला सरदार होता.


पाचव्या महिन्याच्या दशमीस बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी बाबेलच्या राजाच्या तैनातीस असणारा गारद्यांचा नायक नबूजरदान यरुशलेमेस आला.


आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले; फितुरी झालो, तुझे विधी व तुझे निर्णय ह्यांपासून आम्ही परावृत्त झालो.


त्या समयी त्यांच्यावर माझा कोप भडकेल, मी त्यांचा त्याग करीन आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवीन; त्यांचा फडशा उडेल व त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवतील. मग ते म्हणतील, ‘आपला देव आपल्यामध्ये नाही म्हणूनच ह्या विपत्ती आपल्यावर ओढवल्या आहेत ना?’


त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्रांचा पाठलाग कसा केला असता! दोघांनी दशसहस्रांना कसे पळवले असते!


म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि लुटारूंनी त्यांना लुटले. परमेश्वराने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले; म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.


तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा जो हासोरात राज्य करत होता त्याच्या हाती त्यांना दिले; त्याचा सेनापती सीसरा हा हरोशेथ-गोयीम येथे राहत असे.


इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले; तेव्हा परमेश्वराने त्यांना सात वर्षे मिद्यानाच्या हाती दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan