Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 5:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्यांनी आम्हांला हे उत्तर दिले : ‘आम्ही स्वर्गाच्या व पृथ्वीच्या देवाचे दास आहोत; जे मंदिर बहुत वर्षांमागे इस्राएलाच्या एका मोठ्या राजाने बांधून पुरे केले होते ते आम्ही बांधत आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्यांनी उत्तर दिले, ‘आम्ही आकाश आणि पृथ्वीच्या देवाचे सेवक आहोत. फार पूर्वी इस्राएलाच्या एका थोर राजाने बांधून पूर्ण केलेल्या मंदिराचेच आम्ही पुन्हा बांधकाम करत आहोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्यांनी आम्हाला असे उत्तर दिले: “आम्ही स्वर्ग आणि पृथ्वीच्या परमेश्वराचे सेवक आहोत. या ठिकाणी पुष्कळ शतकांपूर्वी एका महान इस्राएली राजाने जे मंदिर बांधून पूर्ण केले होते, त्याची आम्ही पुनर्बांधणी करीत आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 5:11
17 Iomraidhean Croise  

मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस.


आणि अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजे आठव्या महिन्यात मंदिर आतल्या एकंदर उपकरणसाहित्यासहित नमुन्याप्रमाणे पुरे झाले. ह्याप्रमाणे ते मंदिर बांधण्यासाठी शलमोनाला सात वर्षे लागली.


परमेश्वराचे मंदिर व राजवाडा ही दोन्ही पूर्ण करण्यासाठी वीस वर्षे लागली.


त्यांचे प्रमुख कोण आहेत त्यांची नावे लिहून आपणाला कळवावीत म्हणून आम्ही त्यांना ती विचारली.


मी राजांसमोरसुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही.


स्वर्गातील देवाचे उपकारस्मरण करा; कारण त्याची दया सनातन आहे.


मग नबुखद्नेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, “अहो शद्रख, मेशख व अबेद्नगो, परात्पर देवाचे सेवकहो, अग्नीतून बाहेर या.” तेव्हा शद्रख, मेशख व अबेद्नगो अग्नीतून बाहेर आले.


तो त्यांना म्हणाला, “मी इब्री आहे; ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे.”


जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन;


मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील;


कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,


कारण मला [ख्रिस्ताच्या] सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला — प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला — तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.


आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?


आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; त्याच्या द्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावर खिळलेला आहे.


परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan