Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 4:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 ह्या यरुशलेमेत पराक्रमी राजे होऊन गेले; त्यांनी महानदाच्या पश्‍चिमेकडल्या सगळ्या देशांवर राज्य केले; लोक त्यांना खंडणी, कर व जकात देत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 यरूशलेमेवर पराक्रमी राजांनी राज्य केले आणि नदीपलीकडच्या सर्व देशावर अधिकार करीत होते. त्या राजांना लोक कर व खंडणी देत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 यरुशलेममध्ये असे बलवान राजे होते की त्यांनी फरात नदीच्या पलीकडील संपूर्ण प्रदेशात राज्य केले व त्यांना कर, खंडणी, नजराणे दिले जात असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 4:20
23 Iomraidhean Croise  

त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, “मिसराच्या1 नदीपासून ते महानदी फरात येथ-पर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो.


महानदापासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत व मिसर देशाच्या सरहद्दीपर्यंत सर्व राज्यांवर शलमोनाने राज्य केले; तेथील लोकांनी शलमोनाच्या सर्व आयुष्यभर त्याला करभार दिला व ते त्याचे अंकित राहिले.


महानदाच्या अलीकडच्या सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या देशांवर जितके राजे होते त्या सर्वांवर शलमोनाचे प्रभुत्व होते; आणि आसपासच्या सर्व देशांच्या लोकांशी त्याचे सख्य असे.


काही दिवसांनी सोरचा राजा हीराम ह्याने आपले सेवक शलमोनाकडे पाठवले; शलमोनाचा अभिषेक होऊन तो आपल्या बापाच्या जागी गादीवर बसल्याचे वर्तमान त्याने ऐकले होते; हीराम व दावीद ह्यांची अखंड मैत्री होती.


पण आता माझा देव परमेश्वर ह्याने मला चोहीकडे स्वास्थ्य दिले आहे; कोणी शत्रू अथवा अरिष्ट राहिले नाही.


त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली आणि सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे गेला तेथे परमेश्वराने त्याला यश दिले.


सोबाचा राजा हदरेजर महानद फराताजवळील आपली सत्ता स्थापित करण्यासाठी जात असता दाविदाने त्याचा मोड केला.


मग दाविदाने दिमिष्काच्या आसमंतातील अराम प्रांतात ठाणी बसवली; अरामी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. जिकडे-तिकडे दावीद जाई तिकडे-तिकडे परमेश्वर त्याला यश देई.


इस्राएलापुढे आपण पराजित झालो हे पाहून हदरेजराचे जे अंकित होते ते दाविदाशी तह करून त्याचे अंकित झाले; ह्यानंतर अराम्यांनी अम्मोनी लोकांना साहाय्य केले नाही.


कित्येक पलिष्ट्यांनी यहोशाफाटास भेटी व खंडणी म्हणून चांदी आणली; अरबी लोक सात हजार सातशे मेंढरे व सात हजार सातशे बकरी ह्यांचे कळप घेऊन त्याच्याकडे आले.


ह्याखेरीज आणखी सौदागर व व्यापारी आणीत; आणि अरबस्तानचे सर्व राजे व देशाचे सुभेदार शलमोनाकडे सोने, चांदी आणीत.


महाराजांस हे विदित व्हावे की ते शहर बांधण्यात आले व त्याचा कोट बांधून झाला तर ते लोक खंडणी, कर व जकात द्यायचे नाहीत; एकंदरीत महाराजांचा मोठा तोटा होईल.


आम्ही महाराजांना हे निक्षून सांगतो की, हे नगर बांधण्यात आले व ह्याचे कोट बांधून तयार झाले तर महानदाच्या पश्‍चिमेकडे आपला काहीच मुलुख राहायचा नाही.”


माझ्या आज्ञेवरून शोध केला त्यात असे आढळून आले की प्राचीन काळापासून हे नगर राजांविरुद्ध बंड करीत आले आहे; बंड व राजद्रोह ह्यांचे हे माहेरघरच आहे.


तर आता असे फर्मान फिरवा की ह्या मनुष्यांनी काम बंद पाडावे, माझ्याकडून दुसरा हुकूम होईपर्यंत त्यांनी नगर बांधू नये.


तसेच आम्ही असे फर्मावतो की, देवाच्या ह्या मंदिरातील जे कोणी याजक, लेवी, गायक, द्वारपाळ, नथीनीम व इतर सेवक असतील त्यांच्यापासून खंडणी, कर अथवा जकात घ्यायची नाही.


समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या1 नदीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो.


हायहाय! लोकांनी गजबजलेली नगरी कशी एकान्तात बसली आहे! राष्ट्रांमध्ये जी थोर तिला कसे वैधव्य आले आहे! परगण्यांमध्ये जी राणी ती कशी करभार देणारी झाली आहे!


अधिपतीची राजवेत्रे होण्याजोगे तिला मजबूत धुमारे आले; ती उंच वाढून तिने मेघांना भेदले व तिच्या बहुत शाखांसहित ती उंचीने मोठी दिसत होती.


मग तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan