एज्रा 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा ते जरूब्बाबेल व पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांच्याकडे येऊन म्हणू लागले, “आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहोत; अश्शूरचा राजा एसर-हद्दोन ह्याने आम्हांला इकडे आणून ठेवले त्या दिवसापासून त्याच देवाला आम्ही यज्ञ करीत आलो आहोत; ह्यास्तव तुमच्याबरोबर आम्हांलाही मंदिर बांधूं द्या;” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा ते जरुब्बाबेल आणि घराण्यांचे प्रमुख यांच्याकडे येऊन म्हणाले, “आम्हासही तुम्हासोबत बांधकाम करु द्या. तुमच्याप्रमाणेच आम्हीही तुमच्या देवाला शोधतो. आणि अश्शूरचा राजा एसरहद्दोन याने आम्हास या जागी आणल्यापासून तुमच्या देवासाठी आम्ही अर्पण करीत आलो आहोत.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा ते जरूब्बाबेल व इतर पुढाऱ्यांकडे आले व म्हणाले, “आपण मिळून काम करू या. कारण तुमच्या परमेश्वराची तुम्हाला जितकी आस्था आहे, तितकीच आम्हालाही आहे. अश्शूरचा राजा एसरहद्दोनने आम्हाला येथे आणल्यापासून आम्ही याहवेहला अर्पणे करीत आहोत.” Faic an caibideil |