एज्रा 4:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आपल्या वाडवडिलांच्या बखरी आपण शोधून पाहाल तर त्यावरून आपणांस कळून येईल की हे शहर बंडखोर असून राजांना व राष्ट्रांना उपद्रव करणारे आहे. प्राचीन काळापासून ह्यात राजद्रोह माजत आला आहे व ह्यामुळेच हे शहर उद्ध्वस्त केले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तुझ्या पित्याच्या नोंद-पुस्तकात शोधून पाहा आणि त्यावरुन हे नगर बंडखोर आहे राजांना व प्रांताला उपद्रव करणारे आहे आणि पुरातन काळापासून यामध्ये लोक बंड करीत असत. या कारणासाठी त्या नगराचा नाश करण्यात आला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आम्ही आपणास अशी विनंती करतो की आपण या शहराचा राजद्रोहाचा जुना इतिहास आपल्या पूर्वजांच्या जुन्या कागदपत्रात शोधून पाहावा, म्हणजे हे नगर मागील काळात किती बंडखोर होते हे आपणास आढळून येईल. राजांच्या विरुद्ध आणि त्याला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार्या राष्ट्रांविरुद्ध बंडाळी केल्यामुळेच या नगराचा नाश करण्यात आला होता. Faic an caibideil |