Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 महाराजांस हे विदित व्हावे की ते शहर बांधण्यात आले व त्याचा कोट बांधून झाला तर ते लोक खंडणी, कर व जकात द्यायचे नाहीत; एकंदरीत महाराजांचा मोठा तोटा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आता राजाला हे समजावे की, जर हे नगर बांधले आणि हे भिंतीचे काम पूर्ण झाले की, ते लोक तुम्हास खंडणी व कर देणार नाहीत, परंतु त्यामुळे राजाची हानी होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परंतु हे शहर पुन्हा बांधले गेले, शहराचे कोट पुन्हा बांधले, तर त्यात महाराजांचे नुकसान आहे, कारण मग यहूदी लोक आपली खंडणी, नजराणे व कर भरण्यास नकार देतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 4:13
9 Iomraidhean Croise  

आम्ही तर दरबाराचे मीठ खात आहोत व महाराजांची अशी अप्रतिष्ठा झालेली पाहणे आम्हांला शोभत नाही म्हणून आम्ही पत्र पाठवून महाराजांना हे कळवत आहोत;


ह्या यरुशलेमेत पराक्रमी राजे होऊन गेले; त्यांनी महानदाच्या पश्‍चिमेकडल्या सगळ्या देशांवर राज्य केले; लोक त्यांना खंडणी, कर व जकात देत असत.


तसेच आम्ही असे फर्मावतो की, देवाच्या ह्या मंदिरातील जे कोणी याजक, लेवी, गायक, द्वारपाळ, नथीनीम व इतर सेवक असतील त्यांच्यापासून खंडणी, कर अथवा जकात घ्यायची नाही.


दुसरे कित्येक म्हणू लागले की, “राजाचा कर भरण्यासाठी आमच्या शेतांवर व द्राक्षांच्या मळ्यांवर आम्ही पैसा काढला आहे.


गर्विष्ठांनी माझ्यावर आळ घेतला आहे; तरी मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन.


अरे कपट करणार्‍या, तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी अनर्थाची योजना करते.


त्याने म्हटले, “हो, देतो.” मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून?”


मग तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan