एज्रा 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा येशूवा, त्याचे पुत्र व बांधव, कदमीएल व त्याचे पुत्र, यहूदाचे वंशज, हेनादाद व त्याचे पुत्र, आणि त्यांचे भाऊबंद जे लेवी ते देवाच्या मंदिरात कारागिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 येशूवा आपले मुले आणि त्याचे भाऊ, कदमीएल आणि त्याची मुले, यहूदाचे वंशज हेनादाद आणि त्याचे मुले व त्याचे भाऊ जे लेवी त्यांच्यासहीत देवाच्या मंदिरात कारागिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाची सर्व देखरेख येशूआ व त्याचे बंधू व पुत्र, तसेच (यहूदाहचे वंशज) कदमीएल व त्याचे पुत्र, हेनादादचे पुत्र व नातेवाईक यांच्यावर सोपविली होती. हे सर्वजण लेवी होते. Faic an caibideil |
यरुशलेमेतील देवाच्या मंदिराप्रत आल्यावर दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्यात जरूब्बाबेल बिन शल्तीएल, येशूवा बिन योसादाक व त्यांचे इतर बांधव जे याजक व लेवी होते त्यांनी आणि जे बंदिवासातून यरुशलेमेस आले होते त्या सर्वांनी कामास आरंभ केला; वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जे लेवी होते त्यांना परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले.